Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: गुंडगिरीला पोलिसांचे अभय गोवा फॉरवर्ड, आप, काँग्रेस नेत्यांचे आरोप

Goa Police: मडगाव सध्‍या गोव्‍यात काहीजणांना धार्मिक कलह निर्माण करायचा आहे आणि त्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्‍या रयतेच्‍या राजाचे नाव वापरले जाते.

Goa Police: मडगाव सध्‍या गोव्‍यात काहीजणांना धार्मिक कलह निर्माण करायचा आहे आणि त्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्‍या रयतेच्‍या राजाचे नाव वापरले जाते. सध्‍या जे काय चालू आहे ते पाहिल्‍यास शिवाजी महाराजांच्‍या नावावर काहीजण गुंडगिरी करत असून

दुर्दैवाची बाब म्‍हणजे या गुंडगिरीला प्रशासन आणि पोलिसांचे अभय मिळते, असा आरोप गोवा फॉरवर्ड, आप आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजातील नेत्‍यांनी आज मडगावात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

सां जुझे द आरियल येथे आज झालेल्‍या धक्‍काबुक्‍कीत गोवा फॉरवर्डचे पर्यावरण विभागाचे प्रमुख फ्रेडी त्रावासो जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्‍यासाठी गोवा फॉरवर्डचे विकास भगत, आपचे संदेश तेलेकर आणि काँग्रेसचे ॲड. विराज नागवेकर यांनी लोहिया मैदानावर पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला.

Goa Police
Goa News: नेसायमध्ये शिवपुतळ्यावरून वाद

मुळात हा पुतळा उभारण्‍यासाठी पंचायतीने अजून परवानगी दिलेली नाही. त्‍यामुळे हा पुतळा बसविणे बेकायदेशीर बाब ठरते.

या बेकायदेशीर उद्‍घाटनाला एक मंत्री कसे जाऊ शकतात असा सवाल या तिन्‍ही नेत्‍यांनी करून मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून या बेकायदेशीर कृत्‍याला पाठिंबा देणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी केली.

विकास भगत यांनी यावेळी बोलताना, हा पुतळा बेकायदेशीररीत्या उभारला जात असल्‍यामुळे गावचे लोक मंत्री फळदेसाई यांच्‍याकडून खुलासा मागण्‍यासाठी आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com