Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप

दिल्ली सरकारचा कुठलाही हात नाही असा खुलासा आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima Coutinho) यांनी केला.
Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप
Published on
Updated on

मडगाव: सध्या गोव्यात (Goa) आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) जो लोकांचा पाठिंबा मिळतो तो पाहून धास्तावलेल्या भाजपने आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या गोवा दौऱ्याचा मुहूर्त साधून दिल्लीत चर्च मोडले असा आरोप गोव्यातील आपच्या कार्यकर्त्यानी आज केला.

केजरीवाल जेव्हा गोव्यात येणार त्याचवेळी चर्च पाडले तर गोव्यातील ख्रिस्ती मतदार आपपासून दूर जाऊ शकतो असे वाटल्यानेच चर्च मोडण्यासाठीव 12 जुलैचा मुहूर्त साधला गेला. ही कारवाई दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या (Deputy Governor) आदेशावरून दिल्ली विकास प्राधिकरणाने (Delhi Development Authority) केली असून त्यात दिल्ली सरकारचा कुठलाही हात नाही असा खुलासा आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima Coutinho) यांनी केला.

Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप
Goa Politics: दिल्लीचा विकास गोमंतकीयांनी पहावा

आपच्या कार्यकर्त्यानी आज या घटनेचा निषेध करण्यासाठी मडगावच्या भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. हे कारस्थान भाजप सरकारने केले आहे आणि गोव्यात काँग्रेस पक्ष भाजपला दोष देण्याऐवजी आपला दोष देऊन भाजपला वाचवू पाहत आहे असा आरोप त्यांनी केला. यावरून भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू हे परत एकदा स्पष्ट झाले आहे असा आरोप वेंझी व्हिएगस यांनी केला.

Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप
Goa: आप'च्या भुलथापांना जनता फसणार नाही: भाजप

यावेळी बोलताना कुतीन्हो यांनी ही कारवाई दिल्ली विकास प्राधिकरणाने केलेली असून हे प्राधिकरण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. हा निकाल न्यायालयाने दिला होता आणि नायब राज्यपालांच्या आदेशावरून ही कारवाई केली गेली. नायब राज्यपालांची नियुक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी केली आहे. जर यात भाजपचा हात नाही तर भाजपातील अल्पसंख्याक आमदार या घटनेचा निषेध का करत नाहीत असा सवाल त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com