Goa Foreigner Tourist : गोव्यात विदेशी पर्यटक घटले; मंत्रालयाची आकडेवारी

Goa Foreigner Tourist :आशिया खंडातील इतर छोट्या देशांकडे कल
Goa Foreigner Tourist
Goa Foreigner TouristDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Foreigner Tourist : तिसवाडी एकेकाळी आशिया खंडातील विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून गोव्याची ओळख होती, परंतु हल्लीच्या वर्षांमध्ये राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांमध्ये चिंता वाढली आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ केली आहे.

कोविड महामारीचा पर्यटन उद्योगावर घातक परिणाम झाला होता. कोविड काळानंतर पर्यटन पुन्हा सुरू झाले, तेव्हा राज्यात मोठ्या संख्येत देशी पर्यटकांचे आगमन झाले होते. परंतु चिंतेची बाब म्हणजे यात काळात विदेशी पर्यटकांची संख्येत कमी झाली.

त्यात लहान शहरांशी विमानसेवेद्वारे जोडणी झाल्यानंतर देशाच्या काना कोपऱ्यातून पर्यटक गोव्यात येत आहे, अशी आकडेवारी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जाहीर केली आहे.

पर्यटन उद्योगातील घटकानुसार गोव्यात अगोदर विदेशी पर्यटक मोठ्या संख्येत येत होते, कारण येथे येऊन त्यांना सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ आणि शांत परिसर अनुभवता येत होते. परंतु आता परिस्थिती बदलली असून गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ राहिलेले नाही.

येथील साधनसुविधा देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कमकुवत असल्याने विदेशी पर्यटन आशिया खंडातील इतर छोट्या देशांकडे वळत आहेत. यात मलेशिया, थायलंड, श्रीलंका, व्हिएतनाम इत्यादी यांचा समावेश आहे.

गोव्यात पोहोचल्यानंतर फेरीवाल्यांकडून सतावणूक केली जाते. समुद्रकिनाऱ्यावर देखील देशी पर्यटक सेल्फीच्या नावाआड त्यांना त्रास देतात. गोव्यातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्याशिवाय समुद्रकिनाऱ्यावर साधनसुविधा नसल्याने देखील विदेशी पर्यटक इतर स्थळांवर जाणे पसंती दर्शवत आहे, असे घटकांचे म्हणणे आहे.

Goa Foreigner Tourist
Goa Crime News: अनुराग राजवतची दोन तास चौकशी

साधन सुविधांचा अभाव

आशियातील इतर पर्यटन ठिकाणांच्या तुलनेत गोव्यातील पर्यटन उद्योगात साधन सुविधांचा अभाव आहे. मुख्य म्हणजे दर्जादार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याकडे काहीही विशेष राहिलेले नाही. प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमध्ये पर्यटन उद्योगावर लक्ष केंद्रित केल्याने दर्जेदार पर्यटक घटण्याची भीती पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी व्यक्त केली आहे.

कोविड काळानंतर गोव्यात विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम झाला आहे. तसेच ई-विझामुळे ब्रिटनमधून येणाऱ्या पर्यटकांना त्रासदायी ठरले आहे. आता इस्रायली-पॅलेस्टाईन युद्धामुळे देखील परिणाम झाला आहे.

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

गोव्यात विदेशी पर्यटक कमी होण्यामागे येथील कचरा कारणीभूत आहे. ब्रिटिश, अमेरिकन, रशियन, इस्रायली पर्यटकांची येथील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे पसंती होती. तसेच विझा मिळवणे देखील कठीण झाले आहे. मलेशिया, थायलंड, श्रीलंका, व्हिएतनाम सारख्या देशांची विझा सेवा सुलभ आहे.

- सावियो मसेएस, हॉटेल उद्योजक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com