उठून पुन्हा खेळायला गेला, पण नियतीने डाव अर्ध्यावरच संपवला! बाणावलीच्या मैदानावर 26 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

Goa Football Player Dies: बाणावली येथील दांडो मैदानावर फुटबॉल सामन्यादरम्यान मंगळवारी (३० जून) सायंकाळी डेलन नॅथॅलिनो कार्व्हालो (वय २६) या खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Goa Football Player Dies
Goa Football Player DiesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बाणावली येथील दांडो मैदानावर फुटबॉल सामन्यादरम्यान मंगळवारी (३० जून) सायंकाळी डेलन नॅथॅलिनो कार्व्हालो (वय २६) या खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डेलन हा केपे तालुक्यातील बाणावली येथील रहिवासी असून, युनायटेड बॉईज ऑफ आंबावली या संघासाठी तो खेळत होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Goa Football Player Dies
Football Stars Legs Insurance: मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

माहितीनुसार, युनायटेड बॉईज ऑफ आंबावली विरुद्ध गार्डियन एंजल स्पोर्ट्स यांच्यात हा फुटबॉल सामना सुरू होता. स्पोर्टिंग क्लब काणा-बाणावली यांच्या वतीने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सामना सुरू असताना डेलनने फुटबॉलला हेडर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर उठून त्याने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला; मात्र काही मिनिटांतच तो पुन्हा खाली कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com