Goa Rain Update
Goa WeatherX

Goa Monsoon: पणजीत 5 दिवसांनंतर सूर्यदर्शन! पावसाचा जोर मंदावला; ‘ऑरेंज अलर्ट’ कायम

Goa Rain: राज्यात काल मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा होती; परंतु आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला.
Published on

पणजी: राज्यात काल मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा होती; परंतु आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला. पाच दिवसांनंतर आज सूर्याचेही दर्शन घडले.

सायंकाळपासून मात्र काही भागांत पावसाची रिपरिप सुरू झाली. राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून ताशी ४० ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

Goa Rain Update
Monsoon Update: मान्सूनने गोवा व्यापला, वेगाने आगेकूच; महाराष्ट्रात लवकरच करणार एंट्री!

पणजी मल्टिलेवल पार्किंगशेजारील रस्‍त्यावर आज पहाटे भले मोठे झाड कोसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे झाड हटविले. हे झाड पहाटे पडल्याने अनर्थ टळला.

Goa Rain Update
Monsoon 2025: खुशखबर! गोव्यात नैऋत्य मान्सून दाखल, 12 दिवस अगोदरच लावली हजेरी; चार दिवस ऑरेंज अलर्ट

मुंबईकरांची दाणादाण

महाराष्ट्रात वेळेपूर्वीच आगमन केलेल्या मॉन्सूनने आज मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईतील मे महिन्यात १०७ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस होता. या विक्रमी पावसाने अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले. मोसमी वाऱ्यांनी आज पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत धाव घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com