'सोपो' वसूल न केल्याने ‘SGPDA’ला दिवसाकाठी 30 हजारांचा फटका..

एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट मधील सोपो वाद कायम
 Goa Fish Market of SGPDA

Goa Fish Market of SGPDA

Dainik Gomantak

मडगाव: येथील एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट (Goa Fish Market) मधील सोपो वाद कायम असून बाजारांत आलेल्या असंख्य मासळीवाहू वाहनांकडून पीडीए वा सोपो ठेकेदार यांच्या पैकी कोणीच सोपो वसूल न केल्याने प्राधिकरणाला दिवसाकाठी साधारण तीस हजारांचा फटका बसला आहे. दुसरीकडे फातोर्डा पोलिसांनी बाजार आवारांत कडक बंदोबस्त ठेवल्याने कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही.

<div class="paragraphs"><p> Goa Fish Market of SGPDA</p></div>
एलसीबी करणार कळंगुट तोडफोड प्रकरणाचा तपास; नवीन पथके स्थापन

सोपो ठेकेदार मिलाग्रीसस फर्नाडिस व त्याचे लोक मंगळवारी बाजाराबाहेर दिसले नाहीत की एसजीपीडीएच्या कर्मचा-यांनीही सोपो गोळा केला नाही. ठेकेदार पालिकेला महिनाकाठी 9 लाख चुकते करत होता त्या प्रमाणे हिशेब केला तक सोपो गोळा न केल्याने पीडीएला दिवसाकाठी 30 हजाराचा फटका बसला आहे. त्यातून असा महसुल गोळा करण्यासाठी एसजीपीडीएकडे (SGDPA) कोणतीच यंत्रणा नाही हेही स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाच्या (High Court) सूचना लक्षांत घेऊन पीडीएनेही ठेकेदाराकडे सोपो वसुल करण्याबाबत सक्ती केलेली नाही. त्यामुळे घाऊक मासळी मार्केटांतून (Fish Market) सोपो कोण वसूल करणार याचे उत्तर मिळू शकले नव्हते.

<div class="paragraphs"><p> Goa Fish Market of SGPDA</p></div>
'ज्या पक्षाला तृणमूल पाठिंबा देणार तोच पक्ष राज्यात सरकार चालवणार'

घाऊक विक्रेत्याचा दावा

घाऊक मासळी विक्रेत्या संघटनेचे एक शिष्टमंडळ बुधवारी सकाळी एसजीपीडीएत एक पत्र सादर करण्यासाठी गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष ईब्राहीम यांनी केला. ते म्हणाले सदर बाजारांतील सोपो वसुलीसाठी साडेपंधरा लाख रु. देण्याची संघटनेची तयारी आहे. त्याचा उल्लेख सदर पत्रांत आहे पण ते पत्र स्वीकारण्यास नकार देऊन त्यांनी आपली वृत्ती दाखवून दिली आहे. उच्च न्यायालयाने सोपो वसुलीसाठी निविदा काढून ठेका देण्याची सूचना केली आहे पण ते टाळून एसजीपीडीए न्यायालयाचा अवमान करत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. या पत्राच्या प्रती एसजीपीडीएच्या सर्व सदस्यांना देण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com