Goa Fish Market : घाऊक मासळी मार्केट हलविण्याचा प्रश्र्नच नाही

दाजी साळकर यांचे स्पष्टीकरण : किरकोळ मासळी मार्केटमध्ये सोपो दर वाढविणे अपरिहार्य
Goa Fish Market
Goa Fish Market Gomantak Digital Team
Published on
Updated on

सासष्टी : घाऊक मासळी मार्केटमध्ये जी नवी इमारत बांधण्यात येत आहे, तिचे ८० टक्के काम पूर्ण झाले असुन लवकरच सद्याच्या घाऊक मासळी विक्रेत्यांना नव्या जागेत स्थलांतरीत केले जाईल. त्यामुळे सद्याचे घाऊक मासळी मार्केट इतरत्र हलविण्याचा प्रश्र्नच उदभवत नसल्याचे एसजीपीडीएचे चेअरमन तथा आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. सध्या घाऊक मासळी मार्केटमध्ये रस्त्याच्या बाजूलाच मासळी विक्री केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी इमारतीच्या बांधकामास अडथळा होऊ नये म्हणून घाऊक मासळी मार्केट इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई यांनी आमदार साळकर समवेत फातोर्डा स्टेडियमच्या बाजूला असलेल्या जागेची पाहणी केली होती. नंतर या जागेत साधन सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रश्र्न उपस्थित झाल्याने स्थलांतर प्रक्रिया स्थगित करण्यात आली.

Goa Fish Market
Vasco Market: ग्राहकांविना ओसाड पडले वास्कोतील जुने मासळी मार्केट!

घाऊक मासळी मार्केटमध्ये सोपो कर गोळा करणाऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून निविदेचा मसुदा तयार केला असल्याची माहिती साळकर यांनी दिली.दरम्यान, किरकोळ मासळी मार्केटमधील सोपो दर वाढविणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Fish Market
लवकरच वास्कोतील नवीन मासळी मार्केट बांधण्याच्या कामाला होणार सुरूवात

मासळी मार्केटमध्ये शिस्त आणण्यासाठी मी कडक उपाय योजना करू शकतो, पण मला तसे केलेले नको आहे. मासळी विक्रेत्यांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. आपली जागा सोडून जे विक्रेते लोकांना फिरण्यासाठीच्या जागेत बसतात ती सोडून त्यांनी आपल्याला दिलेल्या जागेत बसावे व ग्राहकांसाठी फिरण्यासाठी जागा मोकळी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विक्रेत्यांनीही आम्हाला समजून घ्यावे !

सध्या या मार्केटमध्ये ४५० मासळी विक्रेते आहेत व त्यांच्याकडून प्रत्येकी दहा रुपये एवढाच सोपो गोळा केला जातो. यातून केवळ ४५०० रुपये महसूल गोळा होतो. मात्र, कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेला प्रत्येक दिवशी ५५०० रुपये द्यावे लागतात. सरकारला हे परवडत नाही.

एसजीपीडीए मासळी विक्रेत्यांना या पेक्षा चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील पण त्यासाठी सोपो दर १०० रुपये वाढविण्याचा प्रस्ताव आम्ही मासळी विक्रेत्यांसमोर मांडला. मात्र, ते ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनीही कुठेतरी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे,असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com