गोव्याला मिळाले पहिले खासगी विद्यापीठ! 'Parul University'मध्ये 75% गोमंतकीय विद्यार्थी; CM सावंतांच्या हस्ते उद्घाटन

Parul University in Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पहिल्यावहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन झाले
Parul University
Parul UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: गोवा सरकारने शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पारुल युनिव्हर्सिटी गोव्याला राज्याच्या पहिल्या खासगी विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. गुरुवार, १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पहिल्यावहिल्या खाजगी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना, आपल्या कार्यकाळात राज्याच्या पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन झाल्याचा आपल्याला आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दक्षिण गोव्यातील केपे येथे स्थापन झालेले हे खाजगी विद्यापीठ ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP)-अनुकूल आणि उद्योग-केंद्रित अभ्यासक्रमांसह गोव्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.

पारुल युनिव्हर्सिटी गोव्यात पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये व्यवस्थापन अभ्यास, संगणक ऍप्लिकेशन्स, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, उपयोजित आणि आरोग्य विज्ञान, फार्मसी, फिजिओथेरपी आणि नर्सिंग अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

पारुल युनिव्हर्सिटी नसती तर...

पारुल युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. देवांशु पटेल यांनी या खासगी विद्यापीठात ७० टक्क्यांहून अधिक गोमंतकीय विद्यार्थी आणि शिक्षक असल्याचा दावा केला, ज्यावर सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र, या उद्घाटनाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोमंतकीय लोकांना पाहून त्यांना आनंद झाल्याचं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले.

पारुल युनिव्हर्सिटी नसती तर गोमंतकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागले असते, जे काही जणांना शक्य झाले नसते आणि त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहिले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Parul University
Parul University: ‘पारुल’ बनले पहिले खासगी विद्यापीठ! गोवा सरकारचे ऐतिहासिक पाऊल; नव्‍या कायद्यांतर्गत अधिसूचना जारी

गोव्यात खासगी विद्यापीठ आल्यावर काय होईल असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, मात्र आता गोमंतकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी मिळतील आणि एक स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

राज्यात ही संस्था १३ कार्यक्रमांमध्ये ५०९ विद्यार्थ्यांसह सुरू होते ज्यापैकी ७५ विद्यार्थी हे गोव्याचे आहेत.हे विद्यापीठ स्थानिक नोकऱ्या निर्माण करताना राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आणखी दोन खासगी विद्यापीठांना मान्यता देण्याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com