Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

Goa First Alliance Formation: कॉंग्रेस व भाजपच्या कंटाळलेल्या मतदारांना आणि सरकारला विटलेल्या मतदारांना पर्याय म्हणून गोवा प्रथम (गोवा फर्स्ट) ही राजकीय आघाडी रविवारी स्थापन करण्यात आली.
Goa First Alliance Formation
Goa Forward AAP AllianceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कॉंग्रेस व भाजपच्या कंटाळलेल्या मतदारांना आणि सरकारला विटलेल्या मतदारांना पर्याय म्हणून गोवा प्रथम (गोवा फर्स्ट) ही राजकीय आघाडी रविवारी स्थापन करण्यात आली. गोवा फॉरवर्ड हा प्रादेशिक व आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष या आघाडीचे सुरवातीचे घटक आहेत.

‘आप’चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा दोनापावल येथे केली. यावेळी त्यांच्यासोबत ‘आप’च्या राज्य प्रभारी आतिषी मार्लेना, राज्य संयोजक वाल्मिकी नाईक, आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर, संयुक्त सचिव आश्मा बी, युवा फॉरवर्डचे अध्यक्ष मेशू डिकॉस्टा, उपाध्यक्ष विकास भगत उपस्थित होते.

Goa First Alliance Formation
Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

केजरीवाल म्हणाले, शुभकार्याची सुरवात गणपतीचे नाव घेऊन केली जाते. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी गोमंतकीयांना चांगला राजकीय पर्याय देण्याची सुरवात केली जात आहे. जनतेला कॉंग्रेस व भाजपशिवाय पर्याय नसल्याने आजवर जनतेला दोन्ही पक्षांनी फसविले आहे. २०१७ मध्ये कॉंग्रेससाठी जनतेने मतदान केले तरी कॉंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये गेले व भाजपचे सरकार आले. त्यानंतर २०२२ मध्येही तसेच झाले. भाजपला जनतेने नाकारले तरी कॉंग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये गेले आणि त्यांनी सरकार बळकट केले.

जनतेने कॉंग्रेसला मतदान केले तरी भाजपचेच सरकार येते असा आजवरचा अनुभव जनतेला आला आहे. त्यामुळे आता जनतेला पर्याय देण्यासाठी गोवा फॉरवर्ड व आप एकत्र आले आहेत. सरदेसाई म्हणाले, जनतेला विरोधी पक्ष एकत्र आलेले हवे आहेत. तशी जनभावना, जनसंवेदना आहे. त्याची दखल घेत विरोधातील ‘आप’ व गोवा फॉरवर्ड हे पक्ष एकत्र आले आहेत. भाजपकडून ‘आप’चे दोन्ही आमदार फोडण्याचे गेल्या चार वर्षांत कित्येक प्रयत्न झाले.

‘आरजी’चा एक आमदारही फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी भाजपला दाद दिली नाही. त्यांच्या या पक्षनिष्ठेमुळेच ‘आप’शी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचार, भू-रूपांतर, कायदा-सुव्यवस्था, कोलमडलेले प्रशासन असे अनेक मुद्दे जनतेला भेडसावत असून याच्या मुळाशी फुटीरता आहे. कॉंग्रेसचे आमदार फुटले नसते तर भाजपचे सरकार स्थीर झालेच नसते. कॉंग्रेसने दोनवेळा जनतेची फसवणूक केली आहे. आता फसवणुकीची हॅट्‌ट्रिक करण्याची संधी देणार नाही.

Goa First Alliance Formation
Goa Politics: सरदेसाईंशिवाय काँग्रेसला पर्याय नाही! भाजपची निवडणूक तयारी जोरात; काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या युतीतील तणाव वाढला

‘काम की बात’ हवी : सरदेसाई

विजय सरदेसाई म्हणाले, लोकांना आता ‘मन की बात’ नको तर ‘काम की बात’ हवी आहे. एकेका मतदारापर्यंत आघाडी पोहोचणार आहे. गणेशोत्सवादरम्यानही गणपतीने अनेकांना सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली जाईल. ‘आप’ने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तसे काम गोव्यात होणे अपेक्षित आहे.

ते ‘आप’ला मतदान करतील!

‘आप’ व गोवा फॉरवर्डची मिळून केवळ ९ टक्के मते होतात. त्याआधारे विजय कसा मिळवता येईल, असे केजरीवाल यांना विचारल्यावर ते म्हणाले, कधी कधी अंकगणित जमत नाही; पण रसायनशास्त्र काम करते. भाजप व कॉंग्रेसचे मूळ मतदार दोन्ही पक्षांच्या सध्याच्या नेत्यांच्या कामगिरीला कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधात आहे. भाजपचे मतदार कधीही कॉंग्रेसला मतदान करणार नाहीत. ते ‘आप’ला मतदान करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com