Bambolim News: गोमेकॉमध्ये 'क्यूबिक इन्फ्रा'तर्फे होणार मनोरुग्णालयाची उभारणी

हा प्रकल्प वर्षअखेरीस पूर्ण होणार
Hospital
HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

Bambolim News: बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मनोरुग्णालय बांधण्यासाठी क्यूबिक इन्फ्राने 105 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GSIDC) द्वारे मंजूर केलेला हा प्रकल्प वर्षअखेरीस पूर्ण होणार असून 2024 पर्यंत देशभरातील रूग्णांना या हॉस्पिटलद्वारे सेवा देण्यात येणार आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार क्यूबिक इन्फ्राने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मनोरुग्णालय बांधण्यासाठी 105 कोटी रुपयांचा करार केला आहे. या नवीन प्रकल्पाला गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (GSIDC) ने मान्यता दिली आहे.

या वर्षाअखेरीस हे काम पूर्णत्वाला जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. क्यूबिक इन्फ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जैन यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले “अंदाजे रु. 105 कोटी किमतीचा हा प्रकल्प असून 2024 पर्यंत देशाच्या विविध भागातील रुग्णांवर या हॉस्पिटल मध्ये उपचार होणार आहेत.

Hospital
Goa Monsoon 2023: वीज खांब कोलमडले, पडझडीने वाहतूक ठप्प; उत्तर गोव्याला परतीच्या पावसाचा दणका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com