Goa: मांद्रे नॅशनल सायक्लोन प्रकल्पात अग्निशमन दलाला जागा द्यावी- परब

त्या प्रकल्पात अग्निशमन दलाचे (Fire Brigade) केंद्र सुरु करावे अशी मागणी कॉंग्रेस नेते सचिन परब (Sachin Parab) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना केली.
Sachin Parab
Sachin ParabDainik Gomantak
Published on
Updated on

मांद्रे मतदार संघातील (Mandre Constituency) मोरजी आश्वे मांद्रे ,हरमल व केरी तेरेखोल या भागात पावसाळी वादळी , चक्रीवादळ येवून मोठ्या प्रमाणात नुकसानी होते, काही जण बेघर होतात , भविष्यात सुनामी सायक्लोन येवून लोकांच्या घरांची नुकसानी किंवा पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तर , नागरिकाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सरकारमार्फत जुनासवाडा मांद्रे येथे नॅशनल सायक्लोन मेनेजमेंट प्रकल्प (National Cyclone Management Project) उभारला जात आहे . त्या प्रकल्पात अग्निशमन दलाचे (Fire Brigade) केंद्र सुरु करावे अशी मागणी कॉंग्रेस नेते सचिन परब (Sachin Parab) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना केली.

मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून जुनासवाडा मांद्रे येथील सरकारी जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे . एखाद्यावेळी सायक्लोन प्रसंग घडला आणि काही बेघर झाले तर त्याना या प्रकल्पात सुरक्षित वास्तव्य करण्यासाठी या प्रकल्पात सोय करण्यात येणार आहे , त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात आहे.

Sachin Parab
Goa: तोरसेच्या सरपंच पदी दलित समाजाच्या उत्तम वीर यांची बिन विरोध निवड

कॉंग्रेस नेते सचिन परब यांनी सांगितले , संकट काही सांगून येत नाही , आमचा प्रकल्पाला विरोध नाही , मात्र बाका प्रसंग घडेपर्यंत हा प्रकल्प वापराविना खाली ठेवणे कितपत योग्य आहे .असा प्रश्न उपस्थित करून सरकारी प्रकल्पावर जनतेच्या करातील पैसा खर्च करण्यात येत आहे . त्यामुळे रिकामे टेकडे प्रकल्प ठेवणे परवडणारे नाही त्याचा सरकारने वापर करावा , तोपर्यंत सरकारने मांद्रे मतदार संघासाठी खास अग्निशमन दलाचे केंद्र उभारावे किंवा पेडणे अग्निशमन दलाचे कार्यालय ज्या इमारतीत आहे त्या इमारतीच्या खांबांचे कॉक्रीट गळून गेले आहे , त्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे , तो पर्यत ते कार्यालय या इमारतीत स्थलांतरित करावे किंवा नवीन केंद्र उभारावे अशी मागणी होत आहे.

Sachin Parab
Goa Monsoon Update: पिसुर्लेत घर कोसळले, पावसाचा तडाखा कायम

16 मे रोजी चक्रीवादळ आले आणि तालुक्यात पाच दिवस वीज गायब आठदिवस पाणी गायब , सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली , परत वादळ आले तर सरकारी आपत्कालीन यंत्रणा सक्षम सरकारने केली का असा प्रश्न सचिन परब यांनी उपस्थित केला. किनारी भागात मोठ्या प्रमाणात दर वेळी पावसात वीज वाहिन्यावर झाडे , फांद्या पडून वीज प्रवाह खंडित होतो . त्यावर कायमचाच उपाय म्हणजे सरकारने भूमिगत वीज वाहिन्या योजना आखून कार्यवाही करावी आणि ग्राहकाना दिलासा द्यावा अशी मागणी सचिन परब यांनी केली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com