Uttam Veer
Uttam VeerDainik Gomantak

Goa: तोरसेच्या सरपंच पदी दलित समाजाच्या उत्तम वीर यांची बिन विरोध निवड

तोरसे पंचायतीच्या (Torse Panchayat) सरपंचपदी इतिहासात प्रथमच निवडून आलेल्या सर्व पंच सदस्यांनी दलित समाजातील उत्तम वीर (Uttam Veer) यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करून एक आदर्श घालून दिला.
Published on

तोरसे पंचायतीच्या (Torse Panchayat) सरपंचपदी इतिहासात प्रथमच निवडून आलेल्या सर्व पंच सदस्यांनी दलित समाजातील उत्तम वीर (Uttam Veer) यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करून एक आदर्श घालून दिला. निवडणूक आयोगाने मागास वर्गीय , मागासवर्गीय जाती जमाती साठी पंचायत , जिल्हा व पालिका पातळीवर सदस्य होण्यासाठी राखीवता ठेवली , तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक मतदार संघ तोही पेडणे हा राखीव ठेवण्यात आला . मात्र सरपंच उपसरपंच , जिल्हा अध्यक्ष , उपाध्यक्ष , नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष या पदासाठी दलित समाजातील व्यक्ती त्या पदावर पोचावी म्हणून कुठेही आरक्षितता नाही. आरक्षिततेची पर्वा किंवा वाट न पाहता तोरसे पंचायतीवर निवडून आलेल्या एकूण सात पंच सदस्यांनी दलित समाजातील उत्तम वीर याना सरपंचपदी बिनविरोध निवडून एक आदर्श घालून दिलेला आहे.

सरपंच अशोक सावळ यांनी आपल्या पदाचा अलिखित करारानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते . त्यासाठी पंचायत मंडळाची खास बैठक निवडीसाठी झाली , त्यावेळी सरपंचपदासाठी उत्तम वीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली त्याना पंच सुर्यकांत तोरस्कर यांनी अनुमोदन दिले . बबन देसौझा यांनी नाव सुचवले . या वेळी उपसरपंच सुंदरी नाईक , पंच अशोक सावळ , सुर्यकांत तोरस्कर , बबन देसौजा , प्रार्थना मोटे विलास शेट्ये आदी उपस्थित होते . गट विकास कार्यालयातून श्री गावडे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते त्याना पंचायत सचिव मुकुंद उसकईकर व अमर कानोलकर यांनी सहकार्य केले.

Uttam Veer
Goa Election: 'AAP' राजकारण तापवणार

नवनिर्वाचित सरपंच उत्तम वीर यांनी प्रतिक्रिया देताना जो आपल्यावर आपल्या सहकऱ्यानी विश्वास ठेवून आपल्याला सरपंच पद देवून गावाची सेवा करण्याची संधी दिली त्याला आपण पात्र ठरणार आहे .उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सहकार्यातून पूर्ण पंचायत क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com