सत्तरी (Sattari) तालुक्यात दि 23 जुलै रोजी पहाटे म्हादई नदीला (Mhadei River) आलेल्या पुरामुळे (Flooded) या भागातील नागरिकांचे नुकसान झाले. यामध्ये वाळपई, नाणूस (Nanos, Valpoi) येथे असलेल्या अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रातील (Shriram Gosanvardhan Kendra) मुक्या जनावरांना सुद्धा जबरदस्त फटका बसला होता, याची दखल सत्तरी तालुक्यात गेल्या 31 वर्षांपासून समाज उन्नती साठी कार्य करणाऱ्या 'गोवा धनगर समाज सेवा संघाने' (Goa Dhangar Samaj Seva Sangh) घेऊन श्रीराम गोसंवर्धन केंद्राला आर्थिक मदत देऊ केली. सदर गोसंवर्धन केंद्रातील जनावरांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसुन बऱ्याच गुरांना प्राण गमवावा लागला त्याशिवाय इतरही बरेच नुकसान झाल्याचे आढळले (Huge Damaged), यामध्ये चारा व इतर साहित्य वाहून गेल्याने गोसंवर्धन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले होते. (Goa)
गोवा धनगर समाज सेवा केंद्राच्यावतीने समाजात एक चांगले पुण्याचे काम केले जात आहे, त्यामुळे अशा संकटावेळी सर्वांनी गोसंवर्धन केंद्राला मदत करण्याची अत्यंत गरज आहे, याचीच दखल घेऊन गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने या केंद्राला आर्थिक मदत देण्यात आली आहे, असे यावेळी संघाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी सांगितले. यावेळी सचिव पवन वरक, खजिनदार बाबू पावणे, कार्यकरणी सदस्य बिरो काळे, गंगाराम पावणे आदी उपस्थित होते. गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने देण्यात आलेल्या या छोट्याशा मदतीचा स्विकार करून या केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी संघाचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.