Goa: मातीला सुंदर आकार देणारे, अरुण पालयेकर

सरकारकडून मुर्त्यांसाठी मिळणारे अनुदान फार कमी (Goa)
Arun Palyekar making Ganesh idol, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021.
Arun Palyekar making Ganesh idol, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021. Nivrutii Shirodkar / Dainik Gomantak
Published on
Updated on

कला (Art of Sculpture) जन्मताच अंगी असते, तिला योग्य ते मार्गदर्शन वेळेवर मिळाले तर तिचे प्रदर्शन आणि सादरीकरण करताना जो आत्मविश्वास असतो, त्यावरच कलाकार मोठा होतो. साच्यापेक्षा हस्त कलेची कोणतीही मूर्ती सुबक असते, जसा मातीला आकार द्यात तिशी ती मूर्ती घडेल, जोपर्यंत माती ओलसर पर्यत मातीला वळण द्यावे लागते (Shaping the Soil), एकदा माती वाळली कि तिला वळवणे फार कठीण असते, असे मत शेकडो वर्षांची गणेश मूर्तीची परंपरा (Hundreds of years of tradition) जपणारे खारेबांध - पेडणे (Kharebandh - Pernem) येथील मूर्तिकार (Sculptor), चित्रकार (Painter) अरुण पालयेकर यांनी व्यक्त केले. पालयेकर हे गेल्या ३१ वर्षांहून जास्त काळ गणेश मुर्त्या करत आहेत. आजची पिढीतील मुले मातीत हात घालायला मागे असतात. मातीविषयीचा अपप्रचार आजच्या पिढीच्या बाबतीत होताना दिसत आहे, सध्याच्या पिढीतील मुलांना किंवा मुलींना लहानपणीच मातीत हात घालायला देत नाही, त्यामुळे मोठेपणी मुले मातीपासून दूर राहतात, त्यांना लहानपणीच मातीत खेळायला दिले गेले तर ते मोठेपणी मातीत मिसळायला मागे राहणार नाही, या मातीला जर आकार दिला तर त्यातून अप्रतिम, प्रतिभावंत सुबक मूर्ती घडते. घणाचे घाव सोसल्यानंतर त्यातून मूर्ती तयार होते आणि ती मूर्ती अजरामर होते. या मातीशी युवकांनी आपले नाते जोडाले पाहिजे. आणि जोडधंदा (Side Business) किंवा पूर्णव्यवसाय म्हणूनही आपण त्याकडे पाहू शकतो असे मत पेडणेचे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण जयराम पालयेकर यांनी व्यक्त केले. (Goa)

Arun Palayekar and his associates with Ganesh Murti, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021.
Arun Palayekar and his associates with Ganesh Murti, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021. Nivrutii Shirodkar / Dainik Gomantak

मूर्तिकारांना चतुर्थीचे वेध हे एप्रिल महिन्यापासून लागतात, मूर्ती करायची म्हणजे त्यासाठी अगोदर चिकण माती जिथे उपलब्ध असते तिथून आणायची असते, आणि ही माती मे महिन्यात आणल्यानंतर अरुण पालयेकर हे आठ दिवस मातीचे काम केल्यानंतर त्यातून आपल्या हस्त कलेतून सुबक मूर्ती घडवत असतात. ते वझरी येथून माती आणतात. अरुण जयराम पालयेकर यांनी मागच्या ३१ वर्षांपासून पूर्वजांची कला तिसरी पिढी म्हणून जपत आहे, त्यातून पैसा किती मिळतो हे तो दुय्यम भाग आहे. कलेचे मोल कुणीही करू शकत नाही. त्यातून जर आपण प्रामाणिक सेवा कर्म केले तर आपोआप मान प्रतिष्ठा पैसा वैभव हीच कला आपल्याला मिळून देईल असे अरुण सांगतात. मातीला जर संस्कारमय आकार दिला तर त्यातून चांगली मूर्ती घडते आणि हे काम अरुण पालयेकर करीत आहेत. तीन पीड्यांची कला ते केवळ कला म्हणून जोपासत असतात, चतुर्थीचा सण मोठा असल्याने गावागावात मूर्तीचे पूजन होते. सप्टेंबर महिन्यात चतुर्थी असल्याने पालयेकर यांनी मागच्या महिन्यापासूनच मुर्त्या करायला सुरुवात केली आहे.

Arun Palyekar making Ganesh idol, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021.
ऐतिहासिक शिवकालीन श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरात दरड कोसळली

अरुण जयराम पालयेकर यांनी मातीला सुबक आकार देण्याचे बालपणी धडे आपले काका कृष्णा पालयेकर यांच्याकडून घेतले, सुरुवातीला १७० ते मुर्त्या बनवायचे आता मातीत काम करायला कामगार मिळत नसल्याने सध्या आपण १०० मुर्त्या करीत असल्याचे ते सांगतात, सुरुवातीला १५० रुपयाची मूर्ती केली जायची, आता रंगाचे व मातीचे रंग वाढल्याने व कामगार मिळत नसल्याने कमी किमतीत मुर्त्या परवडत नाही असे ते म्हणतात. पालयेकर यांनी घरगुती मूर्ती बरोबरच सार्वजनिक मुर्त्या नऊ फूट उंचीच्या केलेल्या आहेत हस्त कलेतून साकारलेल्या मूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी असते. पेडणे, हरमल, कोरगाव, बेळगाव, मडगाव, सांगे, पालये या भागातील सार्वजनिक मुर्त्या अरुण पालयेकर यांनी केल्या आहेत. मूर्त्यांना सरकारकडून एका मूर्ती मागे १०० रुपये मिळतात, ते खूप कमी आहे. मात्र त्यातून एका मूर्तीसाठी लागणारा रंगच मिळू शकत नाही. हे अनुदान सरकारने वाढवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले व ते अनुदान वेळेवर मिळायला हवे. अरुण पालयेकर यांनी माहिती देताना आपण मूर्तीसाठी लागणारे रंग हे मालवण येथून आणतो, रंगाची खास दुकाने त्या भागात उभारली जातात. प्रत्येक कलाकाराला वाटते कि आपली कला आपल्या वारसदाराने चालवावी असे वाटते परतू कोणत्याही आई वडिलांनी मुलावर दबाव आणू नये. मुलांना ज्या कलेची आवड आहे त्यात त्यांना प्राविण्य मिळवून देण्यासाठी मदत करावी, आपली कला त्यांच्यावर लादू नका असे अरुण पालयेकर म्हणाले, आपली कला पुढच्या पिढीने घ्यावे यासाठी आपण कधीही नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Arun Palyekar making Ganesh idol, In Kharebandh, Pernem - Goa. On Saturday, 31 July, 2021.
गुरुंचे गुणगान केल्‍यास मनाची शुद्धी

मूर्ती काम करण्यासाठी बंधू , मोहन पालयेकर, विश्वास पालयेकर, प्रकाश पालयेकर, विजय पालयेकर मदत करतात, तर खास आपला भाऊ मुंबईहून खास पद्माकर पालयेकर येतात शिवाय आपली पत्नी आश्विनी पालयेकर रंगकामात मदत करते, ती सध्या नगरसेविका बनली आहे. नवीन कलाकारांना या क्षेत्रात मोठा वाव असून प्रामाणिक मन लावून काम करावे लागेल, असे ते म्हणाले. कोणतीही कला जोपासताना अगोदर मनाची तयारी ठेवायला हवी. कोरोना काळात स्थानिक मुर्तीकाराना मोठा फायदा झाला आहे, लॉकडाऊन मुळे मूर्ती आणायला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अनेक नागरिक स्थानिक मूर्तिकारांकडून मुर्त्या विकत घेत असतात. नवीन कलाकारांनी या क्षेत्रात यावे आपण त्यांना विनामूल्य प्रशिक्षण देवू , प्रत्येकांच्या अंगी कला असते ती आपण जोपासायला हवी असे मत पालयेकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com