FDA Raid: 1,700 किलो बेकायदा चिकन जप्त; पण वितरकाला केवळ ताकीद देऊन सोडले! 6 महिने चिकन साठवणाऱ्याला अभय का?

Goa FDA Chicken Seizure: ‘गोमन्‍तक’ने गोव्यातील बेकायदा चिकन वाहतूक व वितरणावर आजच्या अंकात झणझणीत उजेड पाडल्यावर कित्येक लोकांनी हा प्रश्‍‍न विचारला.
Goa FDA Chicken Seizure
FDA RaidDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: ‘डिसेंबरमध्ये ख्रिसमससाठी बाजारात आणण्याचा बेत आखून जून महिन्‍यात आपल्या डीप फ्रीझरमध्ये चिकन साठवून ठेवणाऱ्या ‘त्या’ वेर्णा येथील वितरकावर ‘एफडीए’ने काय कारवाई केली..?’ ‘गोमन्‍तक’ने गोव्यातील बेकायदा चिकन वाहतूक व वितरणावर आजच्या अंकात झणझणीत उजेड पाडल्यावर कित्येक लोकांनी हा प्रश्‍‍न विचारला. मात्र, त्याचे उत्तर, ‘त्या’ वितरकाला फक्त एक ताकीद देऊन सोडले, हीच माहिती हाती लागली.

वेर्णा येथील ‘अग्रवाल कोल्ड स्टोरेज’ या आस्थापनावर ‘एफडीए’ने मंगळवारी छापा टाकून १,७०० किलो चिकन जप्त केले होते. हे चिकन कुणाकडून आणले होते, त्याचा तपशीलही त्या दुकानदाराकडे नव्हता. ‘एफएसएसएआय’च्या नियमानुसार उत्पादनाची माहिती वितरकाने ठेवणे बंधनकारक आहे. या संबंधी ‘एफडीए’च्या संचालक श्वेता देसाई यांना विचारले असता, ‘आम्ही तो चिकनसाठा जप्त करून त्याची विल्हेवाट लावली. त्या वितरकाला आम्ही यापुढे असा अवैध स्वरूपाचा माल ठेवला जाऊ नये, अशी ताकीद दिली आहे.

Goa FDA Chicken Seizure
Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्री सावंतांचे मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन

आमचे अधिकारी वरचेवर तिथे जाऊन तपासणी करतील’, असे त्यांनी सांगितले. ‘असा व्यवहार जे करतील, त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार करून फौजदारी कारवाई करणार’, असे मंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले होते. त्याबद्दल देसाई यांना विचारले असता, ‘भविष्यात आम्ही तसे करू’, असे त्या म्हणाल्या.

‘गोव्यातील ‘एफडीए’ नियमांत कारवाईची तरतूद आहे. मात्र, हे खाते ‘एफएसएसएआय’च्या अखत्यारीत येत असल्याने आणि ‘एफएसएसएआय’च्या धोरणात कारवाईपेक्षा सुधारणा या गोष्टीला अधिक प्राधान्य देण्याचे धोरण असल्याने ‘एफडीए’चे हातही बांधले गेले असावेत. परंतु अवैध व्यवहारात सामील असलेल्यांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.

- प्रिस्को सिक्वेरा, पोल्ट्री उत्पादक संघटनेचे अध्यक्ष

Goa FDA Chicken Seizure
Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.