FDA Raid: आरोग्याशी खेळ! इडली-सांबार, डोसा आणि मेदूवड्यासाठी दूषित पाण्याचा वापर; कळंगुटमध्ये 13 विक्रेत्यांवर 'एफडीए'ची कारवाई

FDA Action Against 13 Vendors: घरगुती अन्नपदार्थ तयार करून उघड्यावर, हातगाड्यांवर तसेच वाहनांच्या डिकीतून विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे.
FDA Raid
FDA RaidDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: घरगुती अन्नपदार्थ तयार करून उघड्यावर, हातगाड्यांवर तसेच वाहनांच्या डिकीतून विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नोंदणी व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी दिलेली दोन आठवड्यांची मुदत संपताच प्रशासनाने कळंगुट बीच रोड परिसरात शनिवारी सकाळी ६ ते १० या वेळेत तपासणी केली. यात नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या १३ विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावली.

तपासणीत या विक्रेत्यांचे स्वयंपाकघर कळंगुटमधील झोपडपट्टी परिसरात असल्याचे आढळले. तेथे अस्वच्छ वातावरणात आणि दूषित पाण्याचा वापर करून इडली-सांबार, मेदूवडा, डोसा व पोहे तयार केले जात होते. हे पदार्थ पर्यटकांना विकले जात होते.

FDA Raid
Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

काही दुकाने व कॅफेचालकांनीही पदार्थांच्या निर्मितीच्या ठिकाणाची शहानिशा न करता विक्रेत्यांना जागा भाड्याने दिल्याचे उघड झाले.भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण कायदा २००६ च्या कलम ३१ अंतर्गत संबंधितांवर कारवाई सुरू असून, अनधिकृत व्यावसायिकांना जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

FDA Raid
Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

विनापरवाना विक्रेत्यांना दंडाचा इशारा

घरगुती अन्न व्यवसायासाठी स्वयंपाकघर व विक्री केंद्राची एफएसएसएआय नोंदणी आवश्यक, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक, निवासी जागेत अनधिकृत व्यवसायासाठी जागा देणाऱ्या घरमालकांवरही कारवाई, विनापरवाना विक्रेत्यांवर कायद्याच्या कलम ६९ नुसार दंडात्मक कारवाई होणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.