

म्हापसा: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत शनिवारी बार्देश तालुक्यातील हडफडे, हणजूण आणि कळंगुट येथील हॉटेल्स व काजू विक्री केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान एकूण १३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार आस्थापनांचे कामकाज तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
या कारवाईत आवश्यक तारीख किंवा लेबलवरील माहिती नसलेले काजू विकणाऱ्या एका विक्रेत्याचा समावेश आहे. तसेच, अस्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यापैकी तीन विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ६९ अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पथकाने कृत्रिम रंग लावलेले ३० किलो तंदुरी पदार्थ व चिकन लॉलीपॉप, २० किलो बिर्याणी आणि १० किलो पेस्ट्री असा तयार अन्नसाठा घटनास्थळीच नष्ट केला. एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा जिल्हा नियुक्त अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.