Goa Crime: सांकवाळ पंच सदस्यांनी मारहाण केल्याचा दावा! वेर्णा पोलिस स्थानकात अफरातफरीची परस्परविरोधी तक्रार दाखल

Goa Crime News: प्रितम हळर्णकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता रामू व लतीफ ( दोघांची पूर्ण नावे माहीत नाहीत) यांनी सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील १३ स्काय इव्हेंट च्या कार्यालयात ओढत आणले.
Goa Latest Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Sancoale IDC Crime News

वास्को: सांकवाळचे पंचायत सदस्य तथा १३ स्काय इव्हेंट अँड प्रॉडक्शन हाऊसचे मालक गिरीश पिल्ले आणि परशुराम दोडामणी यांनी आपल्याला चार दिवस कोंडून ठेवून मारहाण केली, अशी तक्रार स्टॉक पर्यवेक्षक प्रितम हळर्णकर याने केली. तर आपला स्टॉक पर्यवेक्षक हळर्णकर व त्याच्या पत्नीने संगनमताने १४ लाखांची अफरातफर केल्याची तक्रार पिल्ले यांनी वेर्णा पोलिस स्थानकात केली आहे.

याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दोन्ही तक्रारीची दखल घेऊन संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गिरीश पिल्ले हे सांकवाळचे माजी सरपंच व विद्यमान पंच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले यांनी प्रितम हळर्णकर व त्याची पत्नी वैशाली यांच्या विरोधात तक्रार केली आहे. प्रितम हा १३ स्काय इव्हेंट मॅनेजमेंट चा स्टॉक पर्यंवेक्षक, समन्वयक आहे.

Goa Latest Crime News
Goa Land Scam: 'जमीन हडप प्रकरणी विशेष न्यायालय स्थापन करा' गोवा सरकारची मागणी; आता प्रतीक्षा अंमलबजावणीची!

त्याने १३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता स्काय इव्हेंट अँड प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात येऊन तेथील एका मजुराचा मोबाईल फोन तसेच तेथील ड्रॉवरमधील एक लाख रुपये रोख चोरल्याचा तसेच तेथील सीसीटीव्हीची नासधूस केली. तसेच त्याने व त्याच्या पत्नीने संगनमताने १४ लाख रुपयांचा गैरवापर केला आहे,असे तक्रारीत म्हटले आहे.

Goa Latest Crime News
Goa Forest: गोव्याचे वनक्षेत्र वाढले की घटले? राज्‍य, केंद्राच्‍या आकडेवारीत मोठी तफावत

प्रितम हळर्णकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता रामू व लतीफ ( दोघांची पूर्ण नावे माहीत नाहीत) यांनी सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील १३ स्काय इव्हेंट च्या कार्यालयात ओढत आणले. तेथे गिरीश पिल्ले व परशुराम दोडामणी होते. त्यांनी मला ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत कोंडून ठेवले. तसेच लाथ, कमरेचा पट्टा व धातूच्या रॉडने मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com