बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर पिकअपची धडक बसून तुकाराम रामा जांगली (रा.बोणबाग वय ४८) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी अपघातग्रस्त टेंपो ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 23 मे रोजी म्हादईचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील 'म्हादई-प्रवाह प्राधिकरण' हा मैलाचा दगड असल्याचे म्हटले होते. मात्र म्हादईचे पाणी खोऱ्या बाहेर वळवण्याच्या प्रस्तावाला प्रवाह प्राधिकरणाची कसलीच आडकाठी नसल्याचे दिसून येतेय. आमच्या म्हादईचे रक्षण करण्यासाठी आम्ही 'म्हादई-प्रवाह प्राधिकरणावर अवलंबून राहू शकत नाही- विजय सरदेसाई
कुठ्ठाळी- बांबोळी बायपास रोडवर शीतपेयांच्या बाटल्या घेऊन जाणारा महाराष्ट्र पासिंगचा ट्रक कलंडला. अपघाताचे कारण अस्पष्ट. अपघातानंतर मार्गावर शीतपेयांच्या बाटल्यांचा खच पडला होता.
केरी सत्तरी पंचक्रोशीत गव्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गव्यांच्या कळपाने शेतक-यांच्या बागायती शेतीला लक्ष्य केले आहे. शेतीची पूर्ण नासधूस करीत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.
गवारेड्यांचा वावर हा लोकवस्ती पर्यंत सुरू असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. आज सकाळी गादो वाडा-केरी येथे 8 ते 10 गवारेड्यांचा कळप फिरत होता.
नितीश कुमार यांच्या सोडचिठ्ठीनंतर इंडिया आघाडी संपुष्टात आली आहे. दक्षिण गोवा लोकसभा भाजपच जिंकणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान शंभर टक्के बरोबर असल्याचे वक्तव्य मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले आहे.
उसगाव येथील मयुरी वायंगणकर या युवतीवर हल्ला करणाऱ्या संशयित मंथन गावडे (24, उसगाव, पाली) या हल्लेखोर युवकाला फोंडा पोलिसांनी घेतले ताब्यात.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्याच्या 24 प्रमुख समस्यांवर डबल इंजिन भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड गोव्यातील जनतेसमोर सादर करण्याचे उघड आव्हान दिले.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन आणि दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्या उपस्थितीत मडगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, “मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास नकार देणे म्हणजेच डबल इंजिन भाजप सरकारचे रिपोर्ट कार्ड नापास असल्याचे मान्य करणे होय असा जबरदस्त टोला अमित पाटकर यांनी हाणला.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून उसगावातील 22 वर्षीय युवतीवर तरुणाकडून आज (ता. 14) सकाळी प्राणघातक हल्ला. युवती नेहमीप्रमाणे कामावर जात असताना लपून राहून त्याने दारूच्या बाटलीने केला वार.
याआधी जवळपास 2 महिन्यांपूर्वी असाच प्रयत्न झाला असल्याची माहिती. उपचारासाठी युवतीला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले असून संशयित तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.
श्री क्षेत्र कुरवपूर येथे देवदर्शनाला गेलेल्या डिचोली लामगाव येथील शरद देसाई (66) या भाविकाचे निधन. आज (ता. 14) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती.
अयोध्या दर्शनासाठी गेलेला साखळीतील एक ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न गोवा भाजप सरकार आणि मुख्यमंत्री करताहेत का? केवळ राजकीय हेतूसाठी गोवेकरांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात असून जर याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले नाही, तर आम्ही ही माहिती सार्वजनिक करू.
कमकुवत झालेल्या शिरगाव शाळा इमारतीचे होणार नुतनीकरण. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. 39 लाख रुपये खर्चून इमारतीला देणार नवा साज.
गोव्यातून अयोध्या दर्शनासाठी गेलेल्या ‘आस्था ट्रेन’मधून साखळीतील एक ज्येष्ठ नागरिक माधवपूर स्थानकावरून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरून पुन्हा एकदा गोवा भाजप सरकारने नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचे दिसून येते. या प्रकाराबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची मागणी
मुरगाव भाजप आमदाराच्या हस्तक्षेपामुळे मुरगाव बंदरातून बराच माल व खनिज पाठवण्याची प्रक्रिया ठप्प. अनेक कंपन्यांचा माल पडून. दहा दिवस बॉक्साइट खनिज पडून असल्याच्या तक्रारी.... निर्यातदारांना नाहक भुर्दंड. निर्यातदार वळले इतर बंदरांकडे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.