Lumpy skin Disease : अखेर ‘लम्पी’चा गोव्यात शिरकाव; 8 गुरांना बाधा

लम्पी विषाणुचा प्रादुर्भाव गोव्यात पोहोचला असून 15 नमुन्यांची चाचणी केली असता आठ गुरांना तो आजार झाल्याचे स्पष्ट झाले.
lumpy skin disease
lumpy skin diseaseDainik Gomantak

Lumpy skin Disease : लम्पी विषाणुचा प्रादुर्भाव गोव्यात पोहोचला असून 15 नमुन्यांची चाचणी केली असता आठ गुरांना तो आजार झाल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक प्रकरणे फोंडा तालुक्यात आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तीन मिश्‍किता यांनी दिली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

लम्पीसंदर्भात गोव्यात गणेशचतुर्थीपूर्वी लसीकरण सुरू करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. लम्पीचा जास्त प्रादुर्भाव गाय आणि बैलांवर होत आहे. असे मिश्‍किता यांनी स्पष्ट केले.

23 सप्टेंबर रोजी इतर राज्यांतून गुरे आणण्यास बंदी आणण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. त्यापूर्वी शेजारच्या राज्यातून आणलेल्या गुरांमध्ये लम्पी सापडला होता. त्यातील गाय ओळखून तिला विलगीकरणात ठेवले आहे. लम्पी रोग हा गोचिड आणि माशांद्वारे पसरतो. यासंदर्भात सर्व गोशाळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी सांगे तालुक्यातील नेत्रावळी गावात लम्पीने थैमान घातले होते, असे मिश्‍किता यांनी सांगितले.

lumpy skin disease
Goa News: मुले पळवणाऱ्या टोळीची धास्ती; विद्यार्थ्यांचा सुरक्षितेसाठी सावधगिरी बाळगा!

लम्पी हा रोग केवळ गुरांमध्ये पसरतो. माणसांत याचा संसर्ग नाही. दूध किंवा मांस एकदा उकळल्यानंतर त्यातील जंतू मरून जातात. त्यासाठी दूध गरम केल्यानंतरच पिण्याची सूचना आम्ही केली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तीन मिश्‍किता यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com