Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Fake Wedding Party: पर्यटन आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात रविवार, ३ ऑगस्ट रोजी ‘फेक वेडिंग’ हा एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.
Goa Fake Wedding Party
Goa Fake Wedding PartyDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटन आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात रविवार (३ ऑगस्ट) ‘फेक वेडिंग’ हा एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तरुणाई, प्रेमी युगल आणि अविवाहित मुला-मुलींनी बँड-बाजा, मेहंदी, संगीत आणि पारंपरिक विधींसह लग्नाचा अनुभव घेतला, मात्र प्रत्यक्षात कोणताही कायदेशीर विवाह झाला नाही.

फेक वेडिंग कार्यक्रमाचा हेतू काय?

या लग्नात पालकांची संमती नव्हती, नातेवाईकांची बंधने नव्हती आणि कोणतेही सामाजिक नियम नव्हते. फक्त मजा, मस्ती आणि लग्नसोहळ्याचा अनुभव हा या इव्हेंटचा उद्देश होता. आयोजकांच्या मते, प्रेमात अपयशी ठरलेल्यांना किंवा कोणत्याही कारणामुळे लग्न करू न शकणाऱ्यांना लग्नाचा अनुभव देणे हा या कार्यक्रमामागील हेतू होता.

Goa Fake Wedding Party
Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजक अद्वैत नाईक म्हणाले, “हा कार्यक्रम पूर्णपणे मनोरंजनासाठी आणि भावनिक आरामासाठी आयोजित केला होता. कुणालाही कायदेशीर बंधन नव्हते, फक्त आनंद आणि रिलॅक्सेशन हा उद्देश होता.”

Goa Fake Wedding Party
ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

परदेशात लोकप्रिय, गोव्यात पहिल्यांदाच

‘फेक वेडिंग’ हा ट्रेंड परदेशी देशांमध्ये आणि मोठमोठ्या महानगरांमध्ये आधीच लोकप्रिय आहे, परंतु गोव्यात याचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले. या अनोख्या इव्हेंटला तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांनी त्याला “मजेदार, तणावमुक्त आणि स्वातंत्र्याचा अनुभव” असे म्हटले. पारंपरिक विवाहसोहळ्यातील खर्च, जबाबदाऱ्या आणि बंधनांपासून दूर, हा एक हलकाफुलका आणि फन-फिल्ड अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com