Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष अन् 52 लाखांचा गंडा! गोव्यात बनावट नियुक्तिपत्रांचे रॅकेट उघड

Fake Appointment Letter Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अबकारी विभागासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने बनावट नियुक्तिपत्रे तयार करत एकाच कुटुंबाला तब्बल ५२ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Fake Appointment Letter Scam
Job ScamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अबकारी विभागासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने बनावट नियुक्तिपत्रे तयार करत एकाच कुटुंबाला तब्बल ५२ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी ताळगाव येथील रहिवासी आणि जुन्या सचिवालयामागे दुकान चालवणाऱ्या अजित शंखवाळकर याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पणजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अजित शंखवाळकर याने पर्वरी येथील निवृत्त सैनिक अनिल तळेकर (६३) आणि त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. अनिल तळेकर यांचा मुलगा मनोज तळेकर याच्यासाठी अबकारी आयुक्तांच्या नावाने बनावट आदेशपत्र तयार करण्यात आले. यासाठी मनोजकडून २७ लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Fake Appointment Letter Scam
Goa Municipal Elections: गोव्यात नगरपालिका निवडणुका फेब्रुवारी 2027 मध्ये? उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान, मनोज तळेकर नियुक्तिपत्र खरे असल्याचे समजून अबकारी आयुक्तांच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी गेला. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी पत्राची तपासणी केली असता ते पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर साहाय्यक अबकारी आयुक्त संकेत साखरदांडे यांनी त्वरित पोलिसांत तक्रार नोंदवली.

पणजी पोलिसांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३८, ३३६(२), ३४०(२), ३३६(३) आणि ३१८(४) अंतर्गत दोन एफआयआर नोंदवले आहेत. साहाय्यक अबकारी आयुक्त संकेत साखरदांडे यांच्या तक्रारीवरून एक, तर निवृत्त सैनिक अनिल तळेकर यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांच्या नावाने...

तळेकर यांची मुलगी मनीषा तळेकर हिला ‘उपलेखा संचालक’ पदावर नियुक्ती दिल्याचे भासवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांच्या नावाने बनावट पत्र तयार करण्यात आले. यासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे एकाच कुटुंबाची एकूण ५२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Fake Appointment Letter Scam
Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

पोलिस उपनिरीक्षक रोहन मडगावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयित अजित शंखवाळकर याला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संशयिताने अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केली आहे का, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com