Goa Crime: ‘गोवा एक्सप्रेस’ प्रकरणातील तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी

रेल्‍वेत गुंगीचे औषध देऊन लूट
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेतील प्रवाशांना खाद्यपदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन 8 प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली होती. त्यांना 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दारा कुमार (29), चंदन कुमार (23) आणि मोहमद सर्ताज (29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही फोंडा परिसरात राहात असले तरी ते मूळ परप्रांतीय असल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली.

12 सप्टेंबर रोजी गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या ‘गोवा एक्सप्रेस’ रेल्वेत आठ प्रवाशांच्या बाबतीत ही घटना घडली होती. या आठ प्रवाशांना या त्रिकुटाने खाद्यपदार्थ दिले होते आणि या खाद्यपदार्थात झोप येण्याचे औषध मिसळले होते.

Goa Crime
Valpoi News : वाळपईत डेंग्यू रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

त्यामुळे ही रेल्वे जेव्हा लोंढा रेल्वे स्थानकावर पोहाचली, तेव्हा या टोळीने आठ प्रवाशांकडील मौल्यवान ऐवज लुटला होता. त्यानंतर या सर्व आठही रेल्वे प्रवाशांना बेळगाव इस्पितळात दाखल केले होते. तेथे त्यांनी झाला प्रकार डॉक्टरांच्या कानी घातल्यानंतर तेथे बेळगाव पोलिस पोचले.

बेळगाव पोलिसांनी झाला प्रकार ऐकून घेतला आणि झिरो क्रमांकाखाली गुन्हा नोंद करून हे प्रकरण गोवा पोलिसांकडे पाठवले. दरम्यानच्या काळात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी संशयितांवर लक्ष ठेवले.

त्यांनी संशयावरून ताब्यात घेतलेले तिघेजण याच प्रकरणातील आरोपी ठरले. सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर या तिन्ही आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी मडगाव रेल्वे पोलिसांकडे सोपवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com