Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिव्यांग प्रवाशांना मदतीसाठी कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

1,500 कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण
Manohar International Airport Mopa
Manohar International Airport MopaDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar International Airport Mopa: उत्तर गोव्याच्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुमारे 1,500 कर्मचाऱ्यांना लवकरच दिव्यांगांना मदतीसाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिव्यांग प्रवाशांना प्रवासात तसेच विमानतळावर चांगला आणि समस्यामुक्त अनुभव मिळावा, यासाठी हे प्रशिक्षण असणार आहे.

Manohar International Airport Mopa
Godda Mini Goa: झारखंडमधील शहरात साकारला मिनी गोवा; वाळूच्या किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी...

GMR आणि नागरी उड्डयण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्य अपंग व्यक्ती आयोगाचा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे. प्रशिक्षण सत्रांतून दिव्यांगांबद्लचा दृष्टीकोन आणि वृत्ती यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या प्रशिक्षणात विमानतळावर कार्यरत सर्व विभाग आणि विमान कंपन्यांचे कर्मचारी सहभागी होतील. हे प्रशिक्षण सत्र आठवड्यातून दोनदा होणार आहे.

अपंग प्रवाशांबाबत चांगला दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण होणार आहे. दिव्यांगांचा प्रवास निर्विघ्न करण्यासाठी, टेक ऑफ आणि लँडिंगपूर्वी पुरविल्या जाणार्‍या सेवांवर बरेच काही अवलंबून असते. याच सेवा चांगल्या पद्धतीने पुरविण्यात येतील.

कर्मचाऱ्यांना अशा प्रवाशांबाबत सहानुभूती असली पाहिजे. दिव्यांगांचा हक्क आणि त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा यासाठी विमानतळ प्रशासन कटिबद्ध आहे, असे GMR ने सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com