Goa Environment:...यामुळे धडे गावाला मोठा धोका

पुलाचे खांब उभारण्यासाठी रेल्वे कंत्राटदाराकडून धडे व कामराळ गावातील दोन्ही बाजूंनी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात माती घालून बुजवून टाकले होते.
Goa  Environment
Goa EnvironmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Environment: रेल्वे दुपदरीकरणासाठी धडे-सावर्डे येथील झुआरी नदीवर समांतर पूल उभारला आहे. या पुलाचे खांब उभारण्यासाठी रेल्वे कंत्राटदाराकडून धडे व कामराळ गावातील दोन्ही बाजूंनी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात माती घालून बुजवून टाकले होते.

आता हे काम झाले तरी ही माती अद्याप काढली न गेल्याने धडे गावातील नदीकाठी असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. रेल्वेचे कंत्राटदार मनमानी करून काम करीत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे दुपदरीकरणाचे काम करताना सावर्डे येथील झुआरी नदीवर पूल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीमध्ये मातीचा भराव टाकून अर्धी नदी मातीने बुजवून टाकली आहे. रेल्वे ट्रॅक घालण्यासाठी ज्याप्रमाणे मातीचा वापर केला जात आहे ते पाहून लोकांमध्ये हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

अजूनही पाहणी नाही

मिराबाग, मोडेल, अस्तेमळ, कामराळ गावांत पुराचे पाणी येण्याची भीती आहे. याविषयी सावर्डे पंचायतीने लोकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून या नदीची पाहणी करण्याची गरज होती; पण आजपर्यंत पंचायत मंडळाने पाहणी केली नसल्याचे गौतम भंडारी यांनी सांगितले.

Goa  Environment
Film Theater: वाळपईतील सिनेमा थिएटर गेल्या चार वर्षांपासून बंदच!

कॉम्प्रायपर्यंतचा भाग हा सीआरझेड क्षेत्राखाली येतो. नदीचे पात्र मातीने बुजविण्यापूर्वी या कंत्राटदाराने किंवा रेल्वेने सीझेडआरएमकडून मान्यता मिळविली होती का?, या नदीचे पात्र बुजविण्यापूर्वी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाविषयी एनआयओकडून अभ्यास करून घेतला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जर सीआरझेडएमकडून मान्यता न घेतल्यास सरळ सरळ हा मोठा गुन्हा ठरत आहे. किनारपट्टी व्यवस्थापन अधिकारिणी ही श्रेष्ठ संस्था असून सीआरझेड क्षेत्रात कोणतेही काम करण्यापूर्वी या प्राधिकरणाकडून मान्यता मिळवावी लागते. - राजेंद्र काकोडकर

कामराळ व धडे या दोन्ही बाजूंनी नदीच्या पात्रात माती व मोठमोठे दगड घातले होते. ते न काढल्याने नदीचे पात्र कमी झाले. त्यामुळे पाण्याची नैसर्गिक वाट बंद झाली आहे. तसेच आता जेव्हा ओहोटी असते तेव्हा नदीचा तळ दिसत असल्याने पावसाळ्यात गंभीर समस्या उपस्थित होऊ शकते. - गौतम भंडारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com