Film Theater: वाळपईतील सिनेमा थिएटर गेल्या चार वर्षांपासून बंदच!

सिनेमा थिएटर बंद असल्यामुळे वाळपईच्या चित्रपटप्रेमींना राज्यातील इतर चित्रपटगृहांत जावे लागत आहे.
Film Theater|Goa
Film Theater|GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Film Theater: वाळपई नगरपालिकेच्या प्रशासकीय सह-व्यावसायिक इमारतीत असलेले सिनेमा थिएटर बंद पडून जवळपास 4 वर्षे होत आली आहे. त्यामुळे वाळपईच्या चित्रपटप्रेमींना राज्यातील इतर चित्रपटगृहांत जावे लागत आहे.

हे थिएटर चालवण्याचे मान्य करणारा सिनेमा हॉल मालक अंदाजे 45 लाख रुपयांचे प्रलंबित भाडे न भरता गायब झाला असल्याचे समजते. नगरपालिकेने दावा केला आहे की त्यांनी थिएटर मालकाला थकबाकी भरण्याबाबत अनेक स्मरणपत्रे पाठवली होती.

परंतु मालकांची त्या पत्रांना प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, भाडे वेळेवर वसूल न केल्याबद्दल कौन्सिल सदस्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले.

2018 मध्ये वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत तत्कालीन पर्ये आमदार प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते या एकमेव सिनेमागृहाचे उद्‍घाटन मोठ्या थाटामाटात झाले होते. हे सिनेमा थिएटर सर्व चित्रपट रसिकांसाठी एक मोठा दिलासा होता. कारण याआधी त्यांना थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा असल्यास त्यांना डिचोली, पणजीपर्यंत जावे लागत.

विशेष म्हणजे तब्बल आठ महिने हे सिनेमागृह सुरू असले तरी भाड्याचा एकही हप्ता पालिकेला भरण्यात आलेला नव्हता. जास्त भाडे आणि प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद आणि कोविडच्या निर्बंधामुळे मालकाला सिनेमा थिएटर बंद करण्यास भाग पाडले गेले.

Film Theater|Goa
Goa Agriculture: सत्तरीमधील कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न

दरम्यान, काही लोकांचेे म्हणणे आहे की पालिकेने चुक करणाऱ्या मालकांवर खूप आधी गंभीर कारवाई करायला हवी होती आणि पालिका इमारतीत असलेली दुकाने आणि सिनेमा हॉल (सर्व सीलबंद) यांची लवकरच निविदा काढून भाडेतत्वावर देणे गरजेचे होते. जेणेकरून आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेला काही प्रमाणात महसूल मिळू शकेल.

वाळपईच्या लोकांकडे मनोरंजनाचे कोणतेही ठिकाण नाही आणि सत्तरीतील आमच्या लोकांसाठी ही एक संधी होती. दुर्दैवाने, मालकाने या थिएटरचे ऑपरेशन बंद केले आणि थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे.

सर्व थकबाकी वसूल केली जाईल यात शंका नाही आणि नगरपालिका सिनेमा हॉलसाठी पुन्हा निविदा काढणार आहे.- शैहजीन शेख, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com