"उत्तम कमावत असाल तर भारत सोडून जा, राजासारखं जगाल!!" गोव्यातील इंजिनियरचं ते Viral Tweet घालतंय धुमाकुळ

Viral Tweet Goa: भारतात ५० हजार कमावत असाल तर तुम्ही एकप्रकारे गरिबीचं जीवन जगताय पण हेच पैसे जर का तुम्ही बाली किंवा थायलंडला जाऊन कमावलेत तर नक्कीच यामधून भरपूर फायदा होईल
Viral Tweet Goa:  भारतात ५० हजार कमावत असाल तर तुम्ही एकप्रकारे गरिबीचं जीवन जगताय पण हेच पैसे जर का तुम्ही बाली किंवा थायलंडला जाऊन कमावलेत तर नक्कीच यामधून भरपूर फायदा होईल
Viral Tweet GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Engineer Viral Tweet

पणजी: गोव्यातील एका गुंतवणूकदाराचं ट्विट सध्या नेटकऱ्यांच्या जगात धुमाकूळ घालतंय. सिद्धार्थ सिंग गौतम नावाच्या एका सिव्हिल इंजिनियर आणि गुंतवणूकदाराने पैसे कमावणाऱ्या भारतीयांना भारत सोडून जा असं म्हणत एक ट्विट केलंय, आणि त्याच्या या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांचे दोन गटांमध्ये विभाजन झाले आहे. काही लोकं सिद्धार्थला पूर्णपणे पाठिंबा देतायत तर काहींच्या मते असं बोलून सिद्धार्थ पूर्णपणे चुकलाय. पण सिद्धार्थ नेमकं काय बोललाय आणि का बोललाय हे जाणून घेऊया...

५ डिसेंबर २०२४ रोजी सिद्धार्थ सिंग गौतमने एक ट्विट केलं होतं ज्यात तो म्हणालाय की २०२५ मध्ये तो भारत सोडून सिंगापूरला जाऊन रहाणार आहे आणि ते देखील कायमचं, कारण त्याला भारतातील प्रदूषित हवेत राहायचं नाही आणि जर का ४० टक्के टॅक्स भरून एवढी प्रदूषित हवा असेल आणि राजकारणी लोकांना यावर काहीही उपाय करायचा नसेल तर त्याला अशा देशात राहायचं नाही.

Viral Tweet Goa:  भारतात ५० हजार कमावत असाल तर तुम्ही एकप्रकारे गरिबीचं जीवन जगताय पण हेच पैसे जर का तुम्ही बाली किंवा थायलंडला जाऊन कमावलेत तर नक्कीच यामधून भरपूर फायदा होईल
Ex Twitter India Head's Viral Tweet: ट्विट्टरच्या माजी इंडिया हेड ने सुशांत सिंह राजपूतच्या ब्लू टिक संदर्भात विचारला हा महत्त्वाचा प्रश्न..

याशिवाय सिद्धार्थने भारतात उत्तम पैसे कमावणाऱ्या प्रत्येकानं देश सोडून जावं असं वादग्रस्त वक्तव्य केलंय.

सिद्धार्थ पुढे असंही म्हणालाय की तुम्ही जर का भारतात ५० हजार कमावत असाल तर तुम्ही एकप्रकारे गरिबीचं जीवन जगताय पण हेच पैसे जर का तुम्ही बाली किंवा थायलंडला जाऊन कमावलेत तर नक्कीच यामधून भरपूर फायदा होईल आणि तुम्ही एखादा राजासारखं आयुष्य जगाल. सिद्धार्थच्या या ट्विटमुळे काही लोकं संतापली आहेत तर काही लोकं त्याचं समर्थन करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com