
कळंगुट: वीज खात्यामार्फत संपूर्ण गोव्यात सध्या आठ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात ११ केव्ही, ३३ केव्ही भूमिगत वीज वाहिनी घालणे, सब स्टेशन उभारणे व अपग्रेशन तसेच ट्रान्सफॉर्मरचे अपग्रेशन आदींचा समावेश आहे, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
बादे, आसगाव येथे सबस्टेशन व भूमिगत वीज वाहिनी घराण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, हणजूण जिल्हा पंचायत सदस्य तथा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष निहारिका मांद्रेकर, शिवोली जिल्हा पंचायत सदस्य सनिशा तोरस्कर, ओशेलच्या सरपंच अॅड. रेषल आरापोरकर, सडयेच्या सरपंच दीपा पेडणेकर, आसगावचे सरपंच हनुमंत नाईक आदी उपस्थित होते.
ढवळीकर यांनी पुढे सांगितले की, ज्यांचे घर स्लॅबचे आहे व ज्यांना वीज जास्त प्रमाणात लागते, त्यांनी सोलर योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत विजेचा वापर मोफत होऊन जाईल, असे ते म्हणाले.
या नवीन सबस्टेशननंतर मतदारसंघातील वीज समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. वीज खात्यातर्फे सध्या या मतदारसंघात ९० कोटीची कामे सुरू असल्याचे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी कामकाजाबाबत माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.