Goa Elections: ‘आय पॅक’च्या वतीने गोव्यात तृणमूल काँग्रेसचा झंझावात

Goa Elections: गोव्यात ममतादीदींना गंभीरपणे राजकीय काम करायचे आहे.
Goa Elections: Mamata Banerjee wants to do serious political work In Goa
Goa Elections: Mamata Banerjee wants to do serious political work In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्यांनी गोव्यात (Goa) गेले काही दिवस जोरदार राजकीय गाठीभेटी चालविल्या व काही बुद्धिजीवी घटकांच्या बैठकाही घेतल्या. या पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन व प्रसून बॅनर्जी यांनी उत्तर व दक्षिण गोव्यात (North and South Goa) दोन बैठका घेतल्या. काही महत्त्वपूर्ण नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

Goa Elections: Mamata Banerjee wants to do serious political work In Goa
Goa Elections: नेत्यांनी घेतली शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भेट

तृणमूल काँग्रेस त्याचप्रमाणे प्रशांत किशोर यांच्या ‘आय पॅक’च्या वतीने गोव्यात जोरदार राजकीय हालचाली चालू झाल्या आहेत. ‘आय पॅक’चे कर्मचारी जरी तृणमूल काँग्रेससाठी काम करीत नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात समन्वय आहे. विशेषतः प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसबाबत चाचपणी करीत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यांनी गेल्या आठवड्यात एक दिवसाच्या भेटीत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.

त्यांनी काही नेत्यांना महत्त्वपूर्ण पदे देण्याचेही बोलून दाखविले आहे. सूत्रांनी सांगितले, डेरेक ओब्रायन यांनी उत्तर गोव्यात, तर प्रसून जोशी यांनी दक्षिण गोव्यात महत्त्वपूर्ण लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. दोघांनी आज सकाळी पणजीत, तर संध्याकाळी उशिरा असोळणा येथे बुद्धिजीवींच्या बैठकांत संबोधन केले.

Goa Elections: Mamata Banerjee wants to do serious political work In Goa
Goa Election: लोबो हॅट्‌ट्रिक ‍साधणार काय?

भाजपला हरविण्याची क्षमता

गोव्यात ममतादीदींना गंभीरपणे राजकीय काम करायचे आहे. काँग्रेस पक्ष भाजपविरोधी राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत नाही. संपूर्ण देशात या पक्षाचे नेतृत्व सपशेल अपयशी झाल्याचा आरोप करताना ममतादीदींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अनेक पातळीवर भाजपचा विरोध केला आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत या पक्षाला पाणी पाजले. गोव्यात भाजपला हरविण्याची क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये असल्याचाही दावा त्यांच्या नेत्यांनी केला. गोव्यात आपल्याला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नेत्यांनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com