Goa Election: फडणवीसांच्या ऐवजी गडकरी का नाही?

गोवा निवडणूक (Goa Election) प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली आहे.
Goa Election: Why not Nitin Gadkari in place of Devendra Fadnavis
Goa Election: Why not Nitin Gadkari in place of Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election) पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) गोवा (Goa) निवडणूक (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) काळामध्ये अनेकदा गोव्यात प्रचारासाठी येत असत.(Goa Election: Why not Nitin Gadkari in place of Devendra Fadnavis)

गोव्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्याकडे दिली जाईल अशी अटकळ होती कारण भाजपचा सगळा भर उत्तर गोव्यातील मतदारसंघावर आहे. फडणवीस यांनी अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. मात्र फडणवीस यांच्या निवडीनंतर एक प्रश्न सर्वांना सतावत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी का नाही?

Goa Election: Why not Nitin Gadkari in place of Devendra Fadnavis
Goa Election: मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर

काही लोकांच्या मते गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल पण यावेळी जर गडकरींच्या खांद्यावर धुरा दिली असती तर त्याचा फायदा पक्षाला अधिक झाला असता.

भाजपचे संकटमोचक’ म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची ओळख आहे. गडकरींनी राज्याला प्रकल्पांच्या रूपाने त्यांनी भरभरून दिले आहे. राजकीय पेच सोडवण्यासाठी आणि नेतृत्व ठरवतानाही भाजपच्या वतीने त्यांनीच आजवर राज्य पातळीवर पक्षाचे नेतृत्व केले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी तेच निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतील, असे वाटत होते. मात्र, त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बदलाचे वारे भाजपमध्येही वाहू लागलेत की काय, अशी शंका यावरून आल्याशिवाय राहात नाही.

Goa Election: Why not Nitin Gadkari in place of Devendra Fadnavis
केंद्राच्या अपेक्षा समजून घेवून गोवा निवडणुकीच्या कामाला लागेल: फडणवीस

गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नाही पण निडणुकीची चाहूल मात्र नक्कीच लागली आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पक्षांतरालाही सुरवात झाली आहे. भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी तर भाजपला खाली खेचून विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी आतुर आहेत. अशातच भाजपने फडणवीसांची नेमणूक करून एक पाऊल पुढे टाकले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची निवडणुकीची धुरा पी. चिदंबरम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरर्वड पक्ष यांची युती होणार का, आप फॅक्टर गोव्यात किती चालणार व शिवसेनेची येथे काय भूमिका असणार या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com