Eid al-Adha 2024 : राज्यात बकरी ईद उत्साहात; मुस्लिमांकडून शुभेच्छांची देवाणघेवाण

Eid al-Adha 2024 : सणातून वाढते एकतेची भावना
Eid al-Adha 2024
Eid al-Adha 2024 Dainik Gomantak
Published on
Updated on

Eid al-Adha 2024:

पणजी, गोव्यात सोमवारी बकरी ईद सण नमाज पठण करून साजरा करण्यात आला. राज्यातील मशिदींमध्ये शेकडो मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. मुस्लिमांनी सकाळी नमाज पठर करून नंतर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटी देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. गोड खिरीसह बिर्याणी आणि इतर खाद्यपदार्थ देखील यावेळी लोकांना वाटण्यात आले.

मशिदींमध्ये मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा देणारे इतर समुदायातील लोक एकत्र येणे हे ऐक्य आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे जे राज्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन सद्भावना आणि एकतेची भावना वाढवते.

सर्व गोवा मुस्लीम जमात संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर अहमद यांनी हजरत इब्राहिम यांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवून हा सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन गोव्यातील सर्व मुस्लीम बांधवांना केले होते. वास्कोमध्येही बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लीम बांधवांनी, नेत्यांनी एकमेकांना त्याग आणि एकतेचा संदेश दिला.

तीन दिवस कुर्बानी

दरवर्षी मुस्लीम समुदाय ‘कुर्बानी’ हे धार्मिक कर्तव्य उसगाव येथील गोवा मीट कॉम्प्लेक्सच्या कत्तलखान्यात करतो. यावर्षी १७ जून ते १९ जून असे तीन दिवस कुर्बानी केली जाईल. यासाठी सरकारी अधिकारी आणि गोवा मीट कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापकीय समितीने सर्व व्यवस्था केली, अशी माहिती अहमद यांनी दिली.

Eid al-Adha 2024
Mary D'Souza Sequeira : विक्रमादित्य धावराणी!

डिचोलीत ज्येष्ठांसह मुलांनीही लुटला आनंद

नमाज पठण आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार डिचोलीत मुस्लीम बांधवांतर्फे सोमवारी ‘बकरी ईद’ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह मुलांनीही ईदचा आनंद द्विगुणित केला.

ईदनिमित्त मुस्लीमवाडा येथील आझाद जामा मशीद तशेच दरुल उलूम नूर ए मोहम्मद अहले सुन्नत वाल जमात मशिदीत सकाळी नमाज झाली. नमाजाला मुस्लीम बांधवांनी गर्दी केली होती. नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत आणि ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या. हिंदू तसेच अन्य धर्मीयांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सोमवारी ईदनिमित्त एकमेकांच्या घरी भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. दरम्यान, साखळी तसेच पिळगाव भागातही मुस्लीम बांधवांतर्फे बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com