Mary D'Souza Sequeira : विक्रमादित्य धावराणी!

गोव्यातील हळदोणे येथील किटला गावात त्यांचा जन्म झाला. एक गरीब घरात जन्माला आल्यामुळे परिस्थिती तशी बेताची होती.
Olympian Mary D'Souza Sequeira
Olympian Mary D'Souza SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

गोवा ही कलाकारांची खाण आहे, तशीच ती क्रीडापटुंचीही खाण आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. इथल्या मातीत कला आणी क्रीडा सहज रुजताना दिसतात.

आपण पाहिलं की बॉलिवूड, तियात्र , किंवा मराठी नाटक, यात काम करणाऱ्या प्रथम महिला कलाकार या गोव्याच्या होत्या. त्या काळानुसार स्त्रिया गायन वादन नृत्य क्षेत्रात पुढे येत होत्या इथपर्यंत ठीक आहे.

परंतु जागतिक ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूंपैकी एक गोव्यातली होती हे आपल्याला माहीत आहे काय? एवढेच नव्हे, दुहेरी क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणारीही ती पहिली होती. मेरी डिसोझा सिक़्वेरा आजही आपल्या आयुष्याच्या शतकी वाटचालीत आपल्या देदीप्यमान कारकिर्दीच्या आठवणी जागवीत आपले जीवन व्यतीत करीत आहेत.

१९५१ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत डिसोझा यांनी ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये रौप्य आणि २०० मीटर रिलेमध्ये ब्राँझपदक,१९५४ मध्ये मनिला येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिले मध्ये सुवर्णपदक, १९५१ ते १९५७ या कालावधीत १०० मीटर, २०० मीटर आणि ८० मीटर अडथळा शर्यतीत भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित, १०० मीटरपेक्षा १२.३ सेकंद आणि २०० मीटरपेक्षा जास्त १२.५ सेकंद अशी वेळ नोंदवत आशियाई विक्रम केला.

१९५३ मध्ये फोल्केस्टोन, यूके येथे झालेल्या पहिल्या आयएफडब्ल्यूएचए आंतरराष्ट्रीय महिला फील्ड हॉकी वर्ल्ड स्पर्धेत त्या भारताच्या पहिल्या महिला फील्ड हॉकी संघासह मैदानी हॉकी खेळाडू होत्या. १९५६ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय महिला मैदानी हॉकी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ती भारताकडून सर्वाधिक गोल करणारी खेळाडू होती.

गोव्यातील हळदोणे येथील किटला गावात त्यांचा जन्म झाला. एक गरीब घरात जन्माला आल्यामुळे परिस्थिती तशी बेताची होती, त्यात ती एकूण १२ भावंडं आणि इतरही नातेवाईक असे एकत्र कुटुंब होतं. त्यांचे पोट भरण्यासाठी वडिलांनी मुंबईत येऊन सेंट्रल रेल्वेत इंजिन ड्रायव्हरची नोकरी पत्करली. त्यामुळेच मेरीची रवानगीही मुंबईत झाली.

मुंबईत आपल्या भावांच्या बरोबरीने त्या मैदानी खेळ खेळायच्या. त्यावेळी मुलींनी असे खेळ खेळणे समाजमान्य नव्हते. एवढे मैदानी पराक्रम करूनही त्यांना अगदी त्यांच्या घरून सुद्धा फारसे कौतुक मिळाले नाही. एवढे विक्रम त्यांच्या नावावर असताना त्याना खूप उशिरा म्हणजे २०१३ मध्ये ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला.

Olympian Mary D'Souza Sequeira
गोव्यात पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत 98254 मुलांना मिळाले 'दो बूंद जिंदगी की'

तेही त्यांच्या मुलीच्या प्रयत्नामुळे. हेलनसकी इथे जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, सरकारकडून त्यावेळी तशी तरतूद नव्हती. शेवटी तिच्या मित्र मैत्रिणींनी नृत्याचे कार्यक्रम ठेवून तिला प्रवासासाठी लागणारे ५००० रुपये उभे केले. एवढे कर्तृत्व गाजवूनही त्यांची वर्णी मोठ्या पुरस्कारासाठी लागली नाही याची त्यांना खंत आहे.

नव्वदी पार केलेल्या मेरी यांना हे जीवन संपण्याआधी पद्मश्री मिळावी अशी इच्छा आहे. परंतु या बाबतीत त्याना निराशाच मिळाली आहे. या विक्रमादित्य धावराणीचे चित्र मात्र पणजीच्या गीता बेकरी जवळील उंच इमारतीवर काढण्यात आले आहे याचा त्यांना आनंद वाटतो. या धावराणीला खूप खूप शुभेच्छा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com