LLB Admission Scam : एलएलबी प्रवेश घोटाळ्यात प्राचार्य दोषी!

विद्यापीठ चौकशी समितीचा निष्कर्ष : कारवाईची शिफारस करणार
Goa University LLB
Goa University LLB Dainik Gomantak
Published on
Updated on

LLB Admission Scam एलएलबी प्रवेश परीक्षा घोटाळाप्रकरणी चौकशी करणाऱ्या गोवा विद्यापीठाच्या चौकशी समितीने प्राचार्य साबा दा सिल्वा यांना दोषी ठरविले असून त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस केली जाणार आहे.

सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या चौकशीचा तपशील ठेवला जाणार असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस कारे विधी महाविद्यालयाला केली जाणार आहे.

Goa University LLB
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात इंधनाचे दर जैसे थे; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

कारे महाविद्यालयाची पालक संस्था असलेल्या विद्या विकास मंडळाने यापूर्वीच गोवा विद्यापीठाला पाठविलेल्या पत्रात या चौकशीला संपूर्ण पाठिंबा दर्शविला आणि संपूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते.

परंतु मंडळाच्या कार्यकारिणीचे काही सदस्य या वादग्रस्त प्राचार्यांचे समर्थन करत होते. त्यामुळे महाविद्यालयात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्राचार्यांना यापूर्वीच रजेवर पाठविण्यात आले आहे.

सूत्रांनी सांगितले की, गेले दोन दिवस विद्यापीठाच्या चौकशी समितीने किमान दहाजणांच्या जबान्या नोंदविल्या असून प्राचार्यांनी ज्या पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली, त्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी निवडले, पेन्सिलने खुणा करण्याच्या अजब सूचना केल्या व स्वत:ही कागदपत्रे हाताळली.

Goa University LLB
Goa Burglary Case: गोव्यासह तीन राज्यांमध्ये घरफोड्या, 30 लाखांच्या मुद्देमालासहित चोरटा जेरबंद

त्यामुळे त्यांच्यावरचा संशय गडद झाला. प्राचार्यांचा चिरंजीव या परीक्षेला बसला असल्याने त्यांनी स्वत: परीक्षेच्या सर्व प्रक्रियेपासून दूर राहणे आवश्‍यक होते, तसेच कारे महाविद्यालयासह विद्यापीठालाही तशी माहिती देणे आवश्‍यक होते. तसे न करता पुत्रावर मेहेरनजर करताना त्यांनी रूढ अशा प्रवेश परीक्षा गुण पद्धतीत फेरफार केले व त्यासाठी विद्यापीठाची मान्यताही घेतली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com