सासष्टी: आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे रेल्वेतून अहमदाबादहून (Ahmedabad) गोव्यात (Goa) प्रवास करणाऱ्या आदित्य भंडारी (गुजरात) याला थिवी स्थानकावर विसरलेली बॅग परत मिळाली. दोन लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली ही बॅग प्रवासी घाईघाईने थिवी रेल्वे स्थानकावर (Railway station) विसरून गेला होता. ही बॅग त्याला परत मिळाल्याने त्याने आरपीएफच्या उत्कृष्ट कार्यासाठी कौतुक केले.
आरपीएफचे कर्मचारी आज (21 सप्टेंबर) रोजी थिवी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत असताना, कॉन्स्टेबल नारायण रामच्या निदर्शनास एक बॅग आली. ही बॅग त्याने सुरक्षितरित्या आरपीएफ पोस्ट थिवीममध्ये आणली. थिवी एसआयपीएफने या बॅगची योग्य पडताळणी केल्यानंतर, ज्या प्रवाशाने ही बॅग सोडली होती त्याला फोनवर सदर बॅगची माहिती दिली.
मित्रांसह अहमदाबाद ते थिवी पर्यंत ट्रेन क्रमांक 06337 ने प्रवास करीत होतो, तेव्हा घाईघाईने ही बॅग थिवी रेल्वे स्थानकावर विसरल्याची माहिती आदित्य भंडारी यांनी दिली. नंतर त्याने बॅगची ओळख पटविली व बॅगमधील मुद्देमाल सुरक्षित असल्याचे सांगितले. या बॅगमध्ये 1 लाख रुपये रोकड, ऍप्पलचा लॅपटॉप व 3 तीन हार्ड डिस्क मिळून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर बॅग मालकाकडे देण्यात आली, ज्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आरपीएफच्या उत्कृष्ट कार्यासाठी कौतुक केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.