LLB Admission Scam: साबा दा सिल्वा पूर्णत: दोषीच! आता लक्ष कारवाईकडे

एलएलबी प्रवेश घोळ : साबा दा सिल्वा प्राचार्य पदावर राहण्यास लायक नाहीत : एनएसयूआय
Goa University LLB
Goa University LLB Dainik Gomantak
Published on
Updated on

LLB Admission Scam केवळ आपल्या पुत्राच्या हितासाठी बीए एलएलबी परीक्षेचा संपूर्ण ढाचाच बदलून शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा हे प्राचार्य पदावर राहण्यास लायक नाहीत, अशी प्रतिक्रिया एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने व्यक्त केली आहे. त्यांना या पदावरून हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा या संघटनेचे गोवा राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी दिला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या प्रकरणी प्राचार्य साबा दा सिल्वा यांना पूर्णत: दोषी ठरविले असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी शिफारसही केली आहे.

मात्र, ही कारवाई करण्याची जबाबदारी हे महाविद्यालय चालविणाऱ्या विद्या विकास मंडळ या संस्थेवर असून आता ही संस्था त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Goa University LLB
CM Pramod Sawant: स्वच्छ ऊर्जा रोडमॅप 2050’ लाँच; 2050 पर्यंत राज्य सौरऊर्जेचा 100 टक्के वापर करणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या समितीने आपला अहवाल गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर मांडला होता. सोमवारी किंवा मंगळवारी हा अहवाल कारे विधी महाविद्यालयाला पाठविण्यात येणार असून त्यानंतर विद्या विकास मंडळ त्यावर निर्णय घेणार आहे.

कारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रोहित बरड यांनी ‘गोमन्तक’ला धन्यवाद देताना, अशा प्रवृत्तीच्या शिक्षकांवर कुणीही दया दाखवू नये, असे सांगितले. डॉ. साबा दा सिल्वा यांनी यापूर्वी असे कित्येक प्रमाद केले आहेत.

त्यामुळे काही विद्यार्थ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले होते. मात्र, ते त्या प्रकरणांतून सहीसलामत सुटले. आताही तसेच होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com