Crack Collapsed Near Dudhsagar Tunnel: अखेर दरड हटवली, दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत

कोसळलेली दरड दोन तासानंतर हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश
 crack on the railway track
crack on the railway trackDainik Gomantak
Published on
Updated on

A Crack Collapsed Near The Dudhsagar Tunnel: दूधसागर बोगद्याजवळ कोसळलेली दरड अखेर रेल्वे प्रशासनाकडून हटवण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास दूधसागर बोगद्याजवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मात्र कोसळलेली दरड दोन तासानंतर हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. दरड हटवल्यामुळे वास्कोहून पुण्याला निघालेल्या निझामुद्दीन एक्सप्रेसचा मार्ग मोकळा झालाय. दरड कोसळल्यानंतर ही रेल्वे रोखून ठेवण्यात आली होती. रात्री नऊ वाजता ही रेल्वे पुण्याला रवाना झाली.

 crack on the railway track
Pernem Crime: भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र पळविले; विर्नोडा येथे घडली घटना

दरम्यान आज पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या दूधसागर धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना आज रविवारी पोलिसांनी रोखले होते. मागील काही दिवसांपासून धबधब्यांच्या ठिकाणी होत असलेल्या अपघातांमुळे सध्या प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

धबधब्यावर जाता न आल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी लोंढा आणि वास्कोमधून अतिरिक्त पोलीस फोर्स मागवण्यात आल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com