Pernem Crime
Pernem CrimeDainik Gomantak

Pernem Crime: भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र पळविले; विर्नोडा येथे घडली घटना

नाईक ह्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन मंगळसूत्र लंपास करून चोरट्यानी पळ काढला
Published on

Pernem Crime मधलावाडा विर्नोडा येथे आज दुपारी मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. दुकानाची मालकीण सुचीता सीताराम नाईक (वय 43) या कामात व्यस्त असताना तसेच त्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन त्यांचे मंगळसुत्र लंपास करून दोन चोरट्यानी पळ काढलाय.

मिळालेल्या माहितीनुसार या लंपास केलेल्या सोन्याच्या मंगळसुत्राची किंमत दिड लाख रुपये एवढी होती. हे दोन्ही चोरटे काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलने आले असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर चोरट्यांनी सुचीता नाईक या कामात व्यस्त असल्याचे पाहून आणि दुकानात अन्य कुणीही नसल्याचे फायदा घेउन नाईक यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून मोटारसायकलवरुन पळ काढला.

दरम्यान ते दोघेही हिंदीत बोलत असल्याची माहिती नाईक यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गोलतेकर हे करत आहेत 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com