Goa Drugs Issue : अमली पदार्थांच्या तस्करीत परप्रांतीयांचा वाढता हस्तक्षेप; तेलंगणातील एकाला अटक

आगशी पोलिसांनी तेलंगणातील एकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
Goa Drugs Issue
Goa Drugs IssueDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील वाढते गुन्हे सरकारची आणि गोवा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून सनबर्नमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. यातच राज्यभरात अमली पदार्थांच्या तस्करीलाही वेग आला आहे. पोलीस सापळा रचत आरोपींना ताब्यात घेत आहेत.

Goa Drugs Issue
Goa Tourist Crime : कोलव्यात रशियन नागरिकाकडून सॅटेलाइट फोनचा वापर; फोन जप्त करत गुन्हा दाखल

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आगशी पोलिसांनी तेलंगणातील एकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. कनका परमेश्वर राव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी येथील रेस्टॉरंटवर छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. तो कोणत्या टोळीशी संबंधित आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, हणजूण येथील कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यात 74 ग्रॅम चरस आणि 92 ग्रॅम गांजाचा समावेश आहे. हफजल हबीब (43) आणि प्रीतेश संगम (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पैकी हबीब हा मूळचा केरळचा आहे. तर प्रीतेश हा हणजूण येथीलच रहिवाशी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com