अमलीपदार्थांच्या व्यवहारांमध्ये ४२ टक्के स्थानिक! गेल्या वर्षीच्या तुलनेत अटक केलेल्या आकडेवारीत ८० टक्के वाढ

Goa Drugs Cases: गोवा पोलिसांकडून दिवस-रात्र गस्त घालून, अमलीपदार्थांमध्ये गुंतलेल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जातात
Goa Drugs Cases: गोवा पोलिसांकडून दिवस-रात्र गस्त घालून, अमलीपदार्थांमध्ये गुंतलेल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जातात
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: राज्यातील अमलीपदार्थांच्या व्यवहारात लक्षणीय बदल दिसून आला आहे. अलीकडील आकडेवारी दर्शविते की, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अमली पदार्थांचा व्यापार केल्याबद्दल अटक केलेल्यांपैकी अंदाजे ४२ टक्के हे स्थानिक होते. गोवा पोलिसांनी सांगितले की, राज्य हे पर्यटनस्थळ असल्याने येथे अमलीपदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.

गोव्यात अमलीपदार्थांच्या व्यवहारात स्थानिकांना अटक केलेल्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के वाढ झाली आहे. २०२३मध्ये २८ टक्के स्थानिकांना, तर २०२२मध्ये २३ टक्के स्थानिकांना अमलीपदार्थांच्या तस्करीप्रकरणी पकडले होते. ही धक्कादायक आकडेवारी राज्यातील अमलीपदार्थांच्या बाजारपेठेची बदललेली गतिशीलता दर्शवते.

यावर नियंत्रण मिळविणे हे स्थानिक कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसाठी नवीन आव्हान बनले आहे. गोवा पोलिसांकडून दिवस-रात्र गस्त घालून, अमलीपदार्थांमध्ये गुंतलेल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जातात.

त्यानुसार, ड्रग्स डिलर्सविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न होतो. तसेच बिट पोलिस, पीसीआर वाहने व इतर वाहनांकडून पर्यटकांची मोठी वर्दळ असणाऱ्या जागी गस्त घातली जाते. त्याशिवाय, शाळा, महाविद्यालय व जनतेसाठी वेळोवेळी ड्रग्समुळे होणाऱ्या दुष्परिणांमाविषयी जागृती कार्यक्रम आयोजिले जातात. तसेच नार्को समन्वय बैठकादेखील नियमित जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर होतात. ड्रग्सविरोधी मोहिमेत पोलिस अधीक्षक हे इतर प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयकाची भूमिका निभावतात.

Goa Drugs Cases: गोवा पोलिसांकडून दिवस-रात्र गस्त घालून, अमलीपदार्थांमध्ये गुंतलेल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जातात
Goa Drug Case: तरुणाने घरातच लावली गांजाची झाडे; क्रिप्टो करन्सीत करायचा व्यवहार

अडीच वर्षांत ६५ प्रकरणे

गेल्या अडीच वर्षांत गोवा पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणात ६५ प्रकरणांची नोंद केली. तर ८५ लोकांना अटक केली. ज्यात १९ विदेशी, ४५ परप्रांतीय व २१ गोमंतकीय आहेत. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत गोवा पोलिसांनी अमलीपदार्थांची १३ प्रकरणे नोंदविली. ज्यात १२ जणांना अटक केली असून ज्यामध्ये पाच स्थानिक, चार परप्रांतीय व तीन विदेशींचा सहभाग होता.

अँटी नार्कोटिक सेलचे अधिकारी काही आमदारांना भेटतील ज्यांनी शैक्षणिक संस्थांजवळ ड्रग्स उपलब्ध आहेत, अशी चिंता व्यक्ती केली होती. तसेच ज्यांना ड्रग्स व्यवहारासंबंधी माहिती मिळेल त्यांनी ती संबंधितांना पुरवावी, जेणेकरून अशा पेडलर्सविरोधात कारवाई करता येईल.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com