डिकॉस्ता X गावकर! गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून गणेश गावकर मैदानात

Goa Assembly Speaker Election: विरोधी पक्षाने एल्टन डिकॉस्ता यांचा अर्ज सभापतीपदासाठी सादर करण्यात आला आहे.
Goa Assembly Speaker Election
Ganesh GaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून आमदार गणेश गावकर यांनी आज (२३ सप्टेंबर) अर्ज सादर केला. गावकर सार्वेडेचे भाजप आमदार आहेत. रमेश तवडकरांनी राजीनामा देऊन मंत्रिपद स्वीकारल्यानंतर विधानसभेचे सभापतीपद रिक्त आहे. यासाठी २५ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

गणेश गावकर यांचा सभापतीपदाचा अर्ज सादर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वनमंत्री विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात, रमेश तवडकर, देविया राणे, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, नीलकंठ हळर्णकर, मंत्री सुदीन ढवळीकर यांच्यासह अपक्ष आमदार आणि भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

'गणेश गावकर बहुमताने सभापतीपदी विराजमान होतील', असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Goa Assembly Speaker Election
Konkani Drama: कोकणी नाटक हे 'कोकणी' वाटलं पाहिजे! नाट्यस्पर्धेचं अर्धशतक

"आमदार गणेश गावकर यांचा सभापतीपदासाठी आज अर्ज सादर करण्यात आला. आमच्यासोबत मगोचे सुदीन ढवळीकर आणि तीन अपक्ष आमदार आहेत. गावकर बहुमताने सभापतीपदी विराजमान होतील. २५ तारखेला यासाठी निवडणूक होणार आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतरच त्यांना शुभेच्छा देईन", असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

"विरोधकांकडून देखील उमदेवार रिंगणात आहे. पण, त्यांनाही मतदानासाठी विनंती करण्याचा प्रयत्न करेन", असे गणेश गावकर म्हणाले.

विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात

विरोधी पक्षाने एल्टन डिकॉस्ता यांचा अर्ज सभापतीपदासाठी सादर करण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी विरोधी गटाने डिकॉस्ता यांचा अर्ज सादर केला होता, यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, व्हेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा उपस्थित होते.

Goa Assembly Speaker Election
Rama Kankonkar: ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’ हेच पुन्हा ऐकावे लागणार का? 'जेनिटो' यावेळीही सुटणार का?

तवडकर मंत्री झाल्याने रिक्त झाले पद

रमेश तवडकर यांनी राजीनामा देऊन मंत्रिपद स्वीकारल्याने सभापतीपद रिक्त झाले होते. तवडकर यांच्यासोबत दिगंबर कामत यांनीही शपथ घेतली होती. तवडकरांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपदासाठी गणेश गांवकर यांच्या नावाचीच चर्चा होती. अखेर, पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com