Drishti Marine: सुट्टीच्या कालावधीत 'दृष्टी'ची समुद्रकिनाऱ्यांवर करडी नजर, रशियन महिलेसह 8 जणांचे वाचवले जीव

Goa Drishti Lifesavers: प्रजासत्ताकदिनाच्या सुट्टीच्या कालावधीत राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर उत्तम कामगिरी गोवा सरकारला सेवा देणाऱ्या ‘दृष्टी मरिन’ या कंत्राटी कंपनीच्या जीवरक्षक पथकाने केली.
Drishti Lifesavers Rescue
Drishti Lifesavers RescueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रजासत्ताकदिनाच्या सुट्टीच्या कालावधीत राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर उत्तम कामगिरी गोवा सरकारला सेवा देणाऱ्या ‘दृष्टी मरिन’ या कंत्राटी कंपनीच्या जीवरक्षक पथकाने केली. या आठवड्यातील सुट्टीत, जीवरक्षकांनी एकत्रित तीन आणि दोन व्यक्तींना वाचविले तसेच, हरवलेल्या एका चिमुकल्याला पालकांपर्यंत पोहोचवले आणि दोन जखमींना प्राथमिक उपचारदेखील पुरवले.

बागा समुद्रकिनारी दोन रशियन महिला (३३ आणि ३४ वर्षे) समुद्रात बुडताना जीवरक्षक नंदकिशोर सिंग यांनी तत्काळ धाव घेत दोघींनाही सुरक्षित बाहेर काढले. हरमल समुद्रकिनारी राजस्थानमधील २१ ते २४ वयोगटातील तीन युवकांना जीवरक्षक विक्रम टाळकर आणि आना मळेकर यांनी वाचवले.

कांदोळी समुद्रकिनारी तीन स्वतंत्र घटनांमध्ये बचाव करण्यातदेखील जीवरक्षकांना यश आले. यामध्ये ५८ वर्षीय रशियन महिला, ४२ वर्षीय मयसूनमधील पुरुष, आणि २७ वर्षीय मध्य प्रदेशातील युवक यांचा समावेश आहे. जीवरक्षक दिवाकर देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले. वझरांत समुद्रकिनारी तमिळनाडूच्या ५५ वर्षीय पुरुषाला जीवरक्षक भगवंत परब आणि देवू कुश्नाजी यांनी वाचवले.

Drishti Lifesavers Rescue
Goa Drishti Lifesavers: जीवरक्षकांना चार जणांना वाचवण्यात यश; 11 वर्षीय मुलाला मिळालं जीवनदान

राजस्थानातील ३३ वर्षीय पुरुष मोरजी समुद्रकिनारी पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडला होता. जीवरक्षक विजय मोटे यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले. माजोर्डा समुद्रकिनारी वास्को येथील ४ वर्षीय बालक त्याच्या पालकांपासूनहरवला. दरम्यान द्रीष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी आपले वाहन आणि घोषणांद्वारे या मुलाचा शोध लावला आणि त्याला पालकांच्या स्वाधीन केला.

कळंगुट समुद्रकिनारी चंदीगडच्या २९ वर्षीय व्यक्तीला पाण्यात खेळताना गुडघ्याला दुखापत झाली. आगोंद समुद्रकिनारी आंध्र प्रदेशच्या ३६ वर्षीय व्यक्तीचा पाय खडकावर कापला गेला.या दोघांनाही प्राथमिक उपचार दृष्टी मरिनच्या जीवरक्षकांनी पुरवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com