Goa Beach : सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी; कळंगुट बागा येथे 6 जणांना दृष्टीकडून 'जीवदान'

अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहण्यासाठी उतरतात
Drishti lifeguard
Drishti lifeguardDainik Gomantak

Drishti Lifeguards Rescued Six Tourists At Calangute Baga Beach: स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांची पाउले गोव्याकडे वळली. अनेक पर्यटक मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. त्यामुळे बुडण्याचे प्रकार घडतात.

विकेंड तसेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कळंगुट-बागा समुद्रकिनाऱ्यांवरील जीवरक्षकांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्रात बुडणाऱ्या सहा पर्यटकांना वाचविल्याची माहिती दृष्टिच्या जीवरक्षकांनी दिली.

तर मागील सहा महिन्यात राज्यात 317 जणांना जीवदान देण्यात आले असून, 107 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यात दृष्टी जीवरक्षकांना यश आले आहे.

Drishti lifeguard
Bicholim: अकरावीच्या वर्गात मुलांनी मारला स्प्रे, 11 विद्यार्थिनींना श्वासोच्छवासाचा त्रास; पोलिसांसमोर पेच

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कळंगुट येथे दारूच्या नशेत समुद्रात गेलेल्या मुंबईतील 40 वर्षीय पर्यटकाला दृष्टी जीवरक्षकांनी बुडताना पाण्यातून बाहेर काढले.

इतर घटनांमध्ये, उत्तर प्रदेशातील 24 वर्षीय पर्यटक सोमवारी पाच मित्रांच्या गटासह कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर आला होता.

यावेळी तो मित्रांसह समुद्रात पोहण्यासाठी उतरला असता खोल पाण्यात अडकला. अडकल्याने त्याला पोहता येत नव्हते. जीवरक्षकांनी त्याच्या बचावासाठी धाव घेतली आणि त्याला सुखरूप परत किनाऱ्यावर आणले.

Drishti lifeguard
Calangute News : महाराष्ट्रातील पर्यटकावर कळंगुट समुद्रकिनारी हल्ला, मोबाईलची चोरी; पाच संशयितांना अटक

इतर दोन घटनांंमध्ये मुंबईच्या 32 वर्षीय आणि कर्नाटकच्या 35 वर्षीय या दोन पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले.

बागा समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या पश्चिम बंगालमधील 34 आणि 26 वर्षीय दोन पर्यटकांना सर्फबोर्डच्या मदतीने दृष्टिच्या जीवरक्षकांनी किना-यावर परत आणले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com