Goa Drink And Drive Case: 'बार'वर वॉच ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पेडण्यात दोन गुन्हे दाखल

पेडण्यात नव्या माहिमेतंर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत.
Drink and Drive Ban in Goa
Drink and Drive Ban in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drink And Drive Case: बाणस्तारी येथील भीषण अपघातानंतर राज्यातील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना लक्षात घेता गोवा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्यातील बारवरती पोलिसांकडून वॉच ठेवला जात आहे.

दरम्यान, पेडण्यात नव्या माहिमेतंर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही घटनांमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळून आले आहेत.

नवी मोहीम

दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रात्रीच्यावेळी गर्दी असणारे बार, पब तसेच कॅसिनोंबाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवल्यामुळे रस्ते अपघातांत वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

दारू पिऊन गाडी चालवण्याला प्रतिबंध करण्याच्या हेतून आता बार बाहेर पोलीस तैनात केले जाणार आहेत. यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू पाहणाऱ्यांना बारबाहेरच आळा बसेल.

Drink and Drive Ban in Goa
इराणींनी संसदेत 'तो' फोटो दाखवाला अन् वड्रांनी गोव्यातील रेस्टॉरंटचा विषय काढला; स्मृती, रॉबर्ट आमने-सामने

बार, पब, कॅसिनोंबाहेर साध्या वेशात तैनात केलेले पोलीस दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे काम करतील. मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडून वाहन चालवणाऱ्यांच्या वाहनांचा वाहतूक विभागाला कळवला जाईल. त्यानंतर संबंधित मार्गांवर सापळा रचून वाहतूक पोलीस मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करतील. अशापद्धतीने ही मोहीम राबवली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात 12 हजारांपेक्षा अधिक बार, पब आहेत. अनेक ठिकाणी सायंकाळी आणि रात्रीच्यावेळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे किती ठिकाणी पोलीस गस्त घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bangladeshi Dacoit Gang Goa
Bangladeshi dacoit gang Goa
Goa Police crime branch investigation news
Curchorem Goa Sex Scandal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com