Goa: युवावर्गच साकारेल ‘स्‍वयंपूर्ण गोवा’चे स्‍वप्‍न

Goa: मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : पर्वरीत आदिवासी भवन इमारतीची पायाभरणी
Goa: While unveiling the nameplate of 'Adivasi Bhavan', Dr. Pramod Sawant. Along with Govind Gaude, MLA Pandurang Madkaikar and Others.
Goa: While unveiling the nameplate of 'Adivasi Bhavan', Dr. Pramod Sawant. Along with Govind Gaude, MLA Pandurang Madkaikar and Others.Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी : गौड मराठा समाजाने आपल्या बांधवांचा सर्वांगीण विकास, हे ध्‍येय डोळ्यांसमोर ठेवून सरकारचे सहकार्य घेऊन हे भवन उभे करण्यास सुरुवात केली आहे. समाज आणि सरकार एकत्र आल्यावर विकास कसा होऊ शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. या भवनाचा उपयोग समाजबांधवांना होणारच. त्याचबरोबर सरकारच्या सर्व सोयीसुविधा आणि योजना समाजबांधवांना एकाच ठिकाणी मिळणार आहेत. स्वयंपूर्ण गोवा निर्माण करण्यासाठी समाजातील तरुण वर्गाने पुढे येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. तेव्हाच ‘स्वयंपूर्ण गोवा’चे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री (CM Goa) डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी काढले.

आदिवासी कल्याण संचालनालय आणि गोमंतक गौड मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी भवन’च्‍या (Adivasi Bhawan In Porvari, Goa) इमारतीच्या पायाभरणी समारंभप्रसंगी मुख्‍यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, आमदार पांडुरंग मडकईकर, नामदेव फातर्पेकर, प्रकाश वेळीप, गणेश गावकर, अध्यक्ष विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, वासुदेव गावकर, संचालिका त्रिवेणी वेळीप उपस्थित होते.

Goa: While unveiling the nameplate of 'Adivasi Bhavan', Dr. Pramod Sawant. Along with Govind Gaude, MLA Pandurang Madkaikar and Others.
Goa Crime: "पेपर स्प्रे" मारून पोलिस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला

आमच्या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकारने आम्हाला राजकीय आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी केली.

संचालिका त्रिवेणी वेळीप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ‘आदिवासी भवन’च्‍या इमारतीची पायाभरणी करण्‍यात आली. नंतर नामफलकाचे अनावरण झाले. उदय गावकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास गावडे यांनी आभार मानले.

ग्रामीण भागातील मुलांच्‍या उच्‍चशिक्षणाची होणार सोय

आदिवासी समाजाच्या अनेक नेत्यांनी समाजाची एक भव्य वस्तू असावी, असे स्वप्न पहिले तसेच त्‍याचा सतत पाठपुरावा केला होता. त्यांचे हे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. त्याचा आम्हाला आनंद होत आहे. समाजाची ओळख त्या समाजामध्ये किती लोक उच्चशिक्षित आहेत यावरून होते. या वास्तूमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्चशिक्षण घेण्याची सोय होणार आहे. आदिवासी कल्याण संचालनालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू होत आहे. अंदाजे ४० कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. या प्रकल्पात आदिवासी संचालनालयाचे कार्यालय, महामंडळ, आदिवासी सहकार्य कार्यालय त्याचबरोबर सभागृह, वाचनालय, वसतिगृह, दुकाने यांचा समावेश आहे. सरकारच्या एकलव्य प्रशिक्षण योजनेसारख्या अनेक योजनांचा लाभ या भवनामुळे मुलांना घेता येईल, असे उद्गार आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.

Goa: While unveiling the nameplate of 'Adivasi Bhavan', Dr. Pramod Sawant. Along with Govind Gaude, MLA Pandurang Madkaikar and Others.
Goa Cricket: प्रशिक्षकपदाची सूत्रे भास्कर यांनी स्वीकारली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com