Goa Crime: "पेपर स्प्रे" मारून पोलिस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला

डिचोलीतील घटना, पोलिस हल्लेखोराच्या मागावर (Goa Crime)
Bicholim Police Station, Goa Crime
Bicholim Police Station, Goa CrimeTukaram Sawant / Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलाविण्यात एका संशयित युवकाने (Suspect) ड्युटीवरील पोलिस कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला (Attack on a police constable) केल्याची घटना डिचोली पोलिस स्थानकाच्या (Bicholim Police Station) हद्दीत मुळगाव येथे घडली आहे. संशयित युवकाने या कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर "पेपर स्प्रे"ही मारला (Paper Spry). या हल्ल्यात कॉन्स्टेबल प्रवीण नास्नोळकर हे किरकोळ जखमी होताना सुदैवाने बचावले. कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला करणारा मूळ मुळगाव येथील आणि सध्या सोनारपेठ-डिचोली येथे राहणारा पवन कळंगुटकर हा युवक सध्या फरारी असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. डिचोली पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा संशयास्पदरित्या फिरताना पवन कळंगुटकर आणि अन्य एका युवकाला गस्तीवरील पोलिसांनी हटकले आणि चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावले. तेव्हा काल रात्रीच संशयित दोघेही युवक आपल्या दुचाकीवरुन पोलिस वाहनासोबत पोलिस स्थानकात यायला निघाले. पोलिस स्थानकाजावळ पोचताच दोघांही युवकांनी आपल्या दुचाकीसह पलायन केले. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीचा नंबर नोंद करून घेतला. (Goa Crime)

Bicholim Police Station, Goa Crime
Goa Crime: सिद्धी नाईकच्या हरवलेल्या कपड्यातच लपलंय तिच्या मृत्यूचे गुढ...

असा झाला हल्ला

संशयित युवकांनी रात्री पोलिस स्थानकाकडून पळ काढला, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा पोलिसांचा संशय बळावला. आज सकाळी पोलिसांनी दोघाही युवकांचा शोध घेवून त्यांना चौकशीसाठी पोलिस स्थानकात आणले. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडूनही देण्यात आले. त्यानंतर ड्युटीवरील पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण नास्नोळकर हे आपल्या दुचाकीवरुन जात असता, शिरोडवाडी-मुळगाव येथे संशयित पवन याने आपली दुचाकी आडवी घालून कॉन्स्टेबल प्रवीण नास्नोळकर यांना अडवले. त्यानंतर कॉन्स्टेबल प्रवीण यांच्यावर पेपर स्प्रे मारला.नंतर दगड घेवून कॉन्स्टेबल प्रवीण यांना जीवंत मारण्याची धमकी दिली. पोलिस स्थानकातून बाहेर येताना संशयित पवन याने पोलिसांना रागाने पाहून आपण काय ते पाहून घेतोय. असे पुटपुटला होता. अशी माहिती समोर येत आहे.

Bicholim Police Station, Goa Crime
Goa: विरोध असून देखील दुपदरी रेल्वेरुळांचे काम वेगात सुरु

पोलिस संशयिताच्या मागावर

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी ड्युटीवरील कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याची धमकी आदी आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या 341, 326, 332, 353 आणि 506(2) या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. फरारी पवन कळंगुटकर याचा पोलिस शोध घेत आहेत. मोबाईलवरुन संशयिताचे लोकेशन मिळाले असून, तो लवकरच पोलिसांच्या जाळात अडकण्याची शक्यता आहे. डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करिष्मा परुळेकर या पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com