Curti Zilla Panchayat: 'मगोप-भाजप' एकत्र येणार? ‘कुर्टी’ झेडपी निवडणुकीसाठी नवी समीकरणे

Goa Zilla Panchayat Elections: कुर्टी जिल्हा पंचायतीत कुर्टी- खांडेपार पंचायतीबरोबर वेरे-वाघुर्मे पंचायतीचा समावेश असला तरी मुख्य वाटा कुर्टी-खांडेपार पंचायतीचाच असणार आहे. २०२० साली झालेल्या झेडपी निवडणुकीत या मतदारसंघातून मगो पक्षाच्या प्रिया च्यारी यांनी बाजी मारली होती.
Election
Election Dainik Gomantak
Published on
Updated on

Curti Zilla Panchayat Election

फोंडा: कुर्टी-खांडेपारच्या सरपंचपदी अभिजात गावडे आरूढ झाल्यानंतर आता या पंचायतीचा समावेश असलेल्या कुर्टी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पुढच्या वर्षी नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचे वेध इच्छुकांना आतापासूनच लागला आहे.

कुर्टी जिल्हा पंचायतीत कुर्टी- खांडेपार पंचायतीबरोबर वेरे-वाघुर्मे पंचायतीचा समावेश असला तरी मुख्य वाटा कुर्टी-खांडेपार पंचायतीचाच असणार आहे. २०२० साली झालेल्या झेडपी निवडणुकीत या मतदारसंघातून मगो पक्षाच्या प्रिया च्यारी यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपच्या संजना नाईक यांना जवळजवळ सहाशे मतांनी हरवले होते.

आणि त्यावेळी रवी नाईक काँग्रेसचे आमदार असून देखील काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यावेळी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव ठेवण्यात आला होता. पण यावेळी हा मतदारसंघ आरक्षित असण्याची शक्यता कमी आहे. त्यात कुर्टी- खांडेपार पंचायतीच्या विद्यमान पंचायत सदस्यांचाही समावेश आहे. भिका केरकर हे या पंचायतीतील सर्वात ज्येष्ठ पंच सदस्य असून तेही सध्या झेडपी निवडणुकीकरिता एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

Election
Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

मगोप-भाजप विरुद्ध काँग्रेस लढत शक्य

ही निवडणूक गेल्यावेळेसारखी पक्षीय चिन्हावर लढवली जाणार असल्याची शक्यता असल्यामुळे पक्षपातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. पण यावेळी मगो पक्ष सरकाराचा एक घटक असल्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मगोप- भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com