Mobile Network Issues: गोव्यात 37 गावांत अजूनही नाही 'रेंज', 309 गावांमध्‍ये 'फाय जी' सेवा सुरू

5G services in 309 Goa villages: राज्‍यातील ३७ गावांमध्‍ये अजूनही मोबाईल नेटवर्क पोहोचला नसल्‍याचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आलेे आहे.
Mobile Network Issues
Mobile Network IssuesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील ३७ गावांमध्‍ये अजूनही मोबाईल नेटवर्क पोहोचला नसल्‍याचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आलेे आहे.

राज्‍यातील ३९२ पैकी ३५५ गावांमध्‍ये मोबाईल नेटवर्कचे जाळे पसरले असून, ३७ गावांमध्‍ये अजून नेटवर्क पोहोचलेला नाही. त्‍यात ३२७ गावांमध्‍ये टू जी, १२३ गावांमध्‍ये थ्री जी, ३४५ गावांमध्‍ये फोर जी आणि ३०९ गावांमध्‍ये फाय जी नेटवर्क पोहोचलेला आहे, असे मंत्री सिंधिया यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Mobile Network Issues
Goa Weather Update: कडाक्याच्या उन्हात पावसाची एन्ट्री! पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज

गोव्‍यासह देशभरात नेटवर्कचे जाळे पसरण्‍यासाठी केंद्र सरकारने भारत नेट सेवाही सुरू केलेली आहे. या सेवेअंतर्गत प्रत्‍येक राज्‍यांतील पंचायतींमध्‍ये नेटवर्कचे जाळे विणून कारभार पारदर्शक करण्‍याचा निर्धार सुरू केलेला होता.

Mobile Network Issues
Sexual Assault Cases Goa: राज्यात तीन महिन्यांत लैंगिक अत्याचाराच्या 34 घटना, कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्‍न; तपासाऐवजी प्रकरणे दडपण्याचेच प्रकार अधिक

परंतु, गोव्‍यातील एकाही पंचायतीत भारत नेटअंतर्गत नेटवर्क नाही, असेही आकडेवारीतून समोर आलेले आहे. दरम्‍यान, गोव्‍यातील पंचायतींना ब्रॉडबँडद्वारे नेटवर्क कनेक्‍टीव्‍हिटी देण्‍यात येत असल्‍याने भारत नेटचा वापर होत नसल्‍याचे याआधीच समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com