Cyber Fraud: 2.60 कोटींच्या फसवणुकीतून उलगडले हजारो कोटींचे रहस्य, ईडीकडून दोघे अटकेत; 'डिजिटल अरेस्ट'चा पैसा 400 खात्यांत

Goa Cyber Fraud Case: गोव्यातील ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फहीम मोईन हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद या दोघांना २३ ऑगस्ट रोजी गोव्यात अटक केली.
Goa Cyber Fraud Case
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फहीम मोईन हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद या दोघांना २३ ऑगस्ट रोजी गोव्यात अटक केली. त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोव्यातील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तिच्याकडून २.६० कोटी रुपये उकळण्यात आल्याच्या प्रकरणातून या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास पुढे आला. २१ मे ते २ जून २०२५दरम्यान ही रक्कम विविध बँक खात्यांत वळवण्यात आली. या खात्यांना ‘गुप्त पर्यवेक्षण खाती’ असल्याचे भासवण्यात आल्याचे तपासात आढळले.

Goa Cyber Fraud Case
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

दरम्यान, या कंपन्यांची खाती देशभरातील ३३० पीडितांच्या तक्रारी आणि २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १६३ एफआयआरशी संबंधित असल्याचे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणांत एकूण ४१७.४९ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद आहे.

२० राज्यांतील १६३ एफआयआरशी आर्थिक संबंध

काही तासांत पैशांची मोठी उलाढाल

पीडितेच्या खात्यातून रक्कम बाहेर पडल्यानंतर काही तासांतच ती निष्क्रिय तसेच नव्याने उघडलेल्या खात्यांतून पुढे पाठवण्यात आली. त्यानंतर ४०० हून अधिक लाभार्थी खात्यांत रक्कम विभागण्यात आली. या पैशाचे रोख रकमेत आणि त्यानंतर परकीय चलनात रूपांतर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना असलेल्या ‘फुली फ्लेज्ड मनी चेंजर’ कंपन्यांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले.

Goa Cyber Fraud Case
Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

गोव्यातून तपास; देशभर पसरले जाळे

१ गोव्यातील २.६० कोटी रुपयांच्या फसवणुकीपासून सुरू झालेला तपास आता देशभर पसरलेल्या आर्थिक जाळ्यापर्यंत पोहोचला आहे. फसवणुकीची रक्कम विविध खात्यांत वळवणे, ती लहान व्यवहारांत विभागणे, रोख स्वरूपात काढणे आणि त्यानंतर परकीय चलनात रूपांतर करणे, अशी बहुस्तरीय पद्धत वापरली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

२ गोवा सायबर पोलिसांनी ९ जून २०२५ रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. आता साखळीतील कंपन्यांचे देशभरातील प्रकरणांशी असलेले संबंध शोधण्याचे काम ईडीकडून सुरू आहे.

२७,८५० कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

ईडीचा तपास कमोडिटी ट्रेडिंग, प्रवास सेवा आणि परकीय चलन व्यवहार करणाऱ्या परस्परांशी संबंधित कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. या संस्थांमार्फत २७,८५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बँक व्यवहार झाल्याचे तपासात आढळले. यातील सुमारे २,९०४ कोटी रुपये रोख स्वरूपात जमा करण्यात आले. त्यापैकी ५८४.७० कोटी रुपये ६१,४४८ व्यवहारांद्वारे ‘बल्क नोट अ‍ॅक्सेप्टन्स मशीन’च्या माध्यमातून जमा झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com