Dhirayo: कोरगाव येथे धिरयोचे आयोजन अन् पोलिस बघ्याच्या भुमिकेत

राज्यात धिरयोला बंदी असताना घडला प्रकार
dhiryo
dhiryoDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात बैलांच्या झुंज अथवा प्राण्यांचा छळ होईल असे प्रकार करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. असे असताना पेडणे तालुक्यातील पेडणे, कोरगाव येथे धिरयोचा (Bull Fights) प्रकार आज पुन्हा घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Goa dhirayo bullfighting organize in Corgao Pernem )

dhiryo
Michael Lobo: राज्यातील तरुणांनी मायनिंग ऐवजी पर्यटन व शेतीकडे वळावे

मिळालेल्या माहितीनुसार आज पेडणे तालुक्यातील पेडणे, कोरगाव येथे दोन बैलांच्या झुंज लावत एकमेकांना टक्कर द्यावी यासाठी युवक जोरजोराने ओरडत होते. यामूळे दोन्ही बैल एकमेकांना जोराची टक्कर देत झुंज खेळू लागले. थोड्यावेळाने यातील एक बैल काहीसा जखमी झाल्याने बाजूला जाताना मिळालेल्या व्हिडिओत दिसतो आहे. तरीही या बैलास पुन्हा ओढत आणत झुंज चालू ठेवली जात होती.

dhiryo
Goa IIT: सांगे, केपे,कोटार्लीतील शेतकऱ्यांचा IIT प्रकल्पाला विरोध कायम

महत्त्वाचं म्हणजे हा धिरयो सुरु असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामूळे या प्रकरणात अनेकांवर कारवाईची शक्यता आहे. कारण मिळालेल्या व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार पाहणारे आणि याचा आस्वाद घेणारे यांचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. मात्र पोलिस यावर कारवाई करणार का? करणार असतील तर या प्रकरणाच्या तळाशी जाणार का? हा संशोधनाचा मुद्दा आहे.

पिपल्स फॉर ॲनिमल या बिगरसरकारी संस्थेने धिरयोविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली अन् उच्च न्यायालयाच्या आदेशाने गोव्यात धिरयोवर बंदी आली. असे असताना आज पुन्हा हा प्रकार घडल्याने कारवाई होणार का? झाली तरी सर्वांवर होणार की कादगावर राहणार हे महत्त्वाचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com