काणकोणातील आदिवासी भागात धिल्ल्या उत्सवास प्रारंभ

लग्न करून सासुरवाडीला गेलेल्या मुली धिल्ल्याच्या उत्सवाला खास माहेरी येतात
धिल्लो उत्सवात धिल्ल्याची गीते गात फुगडी खेळणाऱ्या महिला व युवती.
धिल्लो उत्सवात धिल्ल्याची गीते गात फुगडी खेळणाऱ्या महिला व युवती.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: काणकोणातील (Canacona) आदिवासी भागात दिपावली (Diwali) काळात धिल्ल्या उत्सव (Dhillo Utsav) साजरा करण्यात येतो. या उत्सवात प्रामुख्याने युवती व यहिलांचा समावेश असतो. बैलांनी शिंगाना लावून आणलेली माती व शेण एकत्र करून धिल्ल्याची स्थापना केली जाते. धिल्ल्याचा वाड्यावर खास मांड असतो. वाड्यावरील युवती व महिला या निमित्ताने संध्याकाळी, रात्री धिल्ल्यासमोर धिल्ल्याची खास गीते गात फेर धरून फुगडी खेळतात. शेवटच्या दिवशी दुपारी गावजेवण असते. या दिवशी लग्न करून सासुरवाडीला गेलेल्या मुली धिल्ल्याच्या उत्सवाला खास माहेरी येतात.

धिल्लो उत्सवात धिल्ल्याची गीते गात फुगडी खेळणाऱ्या महिला व युवती.
पश्चिम बगल रस्त्यावर मातीचे भराव टाकणे पुन्हा सुरू

येथील काहीच्या मते धिल्लो उत्सव श्री कार्तीकेय महाराजांच्या नावाने साजरा केला जातो. यात पुजेचा मान महिलाना असतो. धिल्ल्याच्या काही गीतांत श्री कार्तीकेय महाराजाचा उल्लेख आढळतो. काणकोणात गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील नाणे, झिल्तावाडी, खोतीगावात येडा येथे धिल्लो उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत असतो हा उत्सव त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते असे नाणे वार्डाचे पंच प्रभाकर गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com